बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया सुरू

0
222

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया सुरू

बारामती दि. २८ : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ चा कार्यक्रम जाहीर केला असून १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

मोरगाव, वागळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळसी अशा एकूण १३ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तहसिल कार्यालय, बारामती येथे नामनिर्देशन फॉर्म दाखल करता येतील. हे फॉर्मस ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागणार आहेत. आज सरपंच पदासाठी मोरगाव येथील २, वाघळवाडीचे ४, व पणदरे येथील २ तर सदस्य पदासाठी मोरगाव येथील १ व पणदरे येथील ३ असे एकूण १२ फॉर्मस दाखल झाल्याची माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here