बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे “चेअरमन पदी” श्री.विक्रम आनंदराव भोसले तर “व्हा. चेअरमनपदी” सौ.सोनाली दादासो जायपत्रे.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे "चेअरमन पदी" श्री.विक्रम आनंदराव भोसले तर "व्हा. चेअरमनपदी" सौ.सोनाली दादासो जायपत्रे.

0
157

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे “चेअरमन पदी” श्री.विक्रम आनंदराव भोसले तर “व्हा. चेअरमनपदी” सौ.सोनाली दादासो जायपत्रे.

(भावनगरी प्रतिनिधी )

बारामती : येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदासाठी विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी, ता. बारामती) तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे (रा.मुढाळे, ता. बारामती)

यांची नावे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोनच अर्ज आल्याने सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 1963 मध्ये झाली. या संस्थेची उलाढाल आज 117 कोटी रुपये असून संस्थेच्या विविध दुकानांच्या 22 शाखा कार्यरत आहेत. औषधे, बी बियाणे, खते, रासायनिक औषधांचा व्यापार संघाच्या वतीने केला जातो.

संघामध्ये 126 कर्मचारी कार्यरत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वाची आहे. बारामती तालुक्यातील एक प्रमुख सहकारी संस्था म्हणून खरेदी विक्री संघाकडे पाहिले जाते.
नवनिर्वाचित बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले यांनी यापूर्वी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सहा वर्ष अध्यक्ष पद भूषवले तर डॉक्टर पद्मश्री आप्पासाहेब पवार पतसंस्थेच्या चेअरमन पदी ,तर हनुमान विकास सोसायटी वानेवाडी चेअरमन पदी कार्य केले. दांडगा जनसंपर्क युवकांमध्ये कार्य कुशलता सामाजिक व राजकीय धोरण असलेला युवा कार्यकर्ता बारामती खरेदी-विक्री देखरेख संघाच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here