बारामती ड्रायक्लीनर्सचे दिमाखदार उद्घाटन; प्रदीप गिराम यांच्या नव्या उद्योगाला मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा….

0
3

बारामती ड्रायक्लीनर्सचे दिमाखदार उद्घाटन; प्रदीप गिराम यांच्या नव्या उद्योगाला मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा….

बारामती : मेहनत, जिद्द आणि स्वप्नांना कृतीची जोड मिळाली की यशाची नवी वाट खुली होते. याच भावनेतून उद्योजक प्रदीप गिराम यांनी सुरू केलेल्या ‘बारामती ड्रायक्लीनर्स’ या अत्याधुनिक लॉन्ड्रीचे उद्घाटन बारामतीच्या पंचक्रोशातील रुई पाटील (रुई गावाजवळ) येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडले.


या नव्या उद्योगाचे उद्घाटन बारामती नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. संपदाताई चौधर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदीप गिराम यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांच्या नव्या उद्योगाला भरभराट लाभो, ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देत पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले.


उद्घाटनप्रसंगी नगरसेविका सौ. संपदाताई चौधर, आजीनाथ (सर) चौधर, अमरजी घाडगे, नक्षत्र फ्रेंड्स ग्रुप, तसेच उद्योजक पंढरीनाथ श्रीरंग कांबळे, राजेभाऊ साळुंके, संजय पाटील, सुधीर उमाप, पंढरीनाथ नाथा कांबळे, चंद्रकांत माने, बाळासाहेब पांढरे, सुनील तावरे, रतिलाल चौधर, संतोष शिंदे, सुनील सर्जे, बाळासाहेब कोठावळे, अरुण जाधव, तसेच संभाजीनगर येथून आलेले त्यांचे बंधू, संतोष ठवाळ, शाहूशेठ, श्रीधर पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी चहापान व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. आपुलकी, स्नेह आणि शुभेच्छांनी भारलेल्या या सोहळ्याने सर्वांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण केले.


प्रदीप गिराम यांच्या या नव्या व्यवसायाच्या शुभारंभामुळे परिसरात रोजगारासह दर्जेदार लॉन्ड्री सेवा उपलब्ध होणार असून, त्यांच्या उद्योगाला उज्ज्वल भवितव्य लाभो, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. गिराम कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या साक्षीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here