बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल वसंतराव पवार तर उपसभापतीपदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि.१६/०५/२०२३रोजी ला बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी विरोधी पक्षनेते मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदी सुनिल वसंतराव पवार,रा.माळेगाव खुर्द यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत,रा.शेरेवाडी-बाबूर्डी यांची नावे जाहीर केली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे कार्याध्यक्ष धनवान
वदक,दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे, लक्ष्मण मोरे, नारायण कोळेकर, तुषार कोकरे, सुनिल बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम,संभाजी किर्वे, सूर्यकांत गादीया व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.