HomeUncategorizedबारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये बुधवार दि. ९/११/२०२२ रोजी कापसाला रू. ९०००/- प्रति क्विंटल दर मिळाला. मागणी व बाहेरील खरेदीदार येत असल्याने कापसाचे दरात वाढ होत असुन आवारात आजही जवळपास १०० क्विंटल आवक झाली. कापसाला सरासरी रू. ८५००/- चा दर मिळाला. आठवड्यातील बुधवार आणि शनिवार या दिवशी कापसाचे लिलाव सुरू असतात. कापसाचे आवकेत वाढ झाल्यास आणखी बाहेरील पेठेतील खरेदीदार येतील अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी सांगितले.

बारामती बाजार समिती मध्ये कापुस लिलावास प्रारंभ झाले पासुन कापसाला मागणी वाढत आहे. कापसाचे दरात आणखी वाढ होईल. आज बिड व इतर ठिकाणच्या व्यापा-यांनी लिलावात भाग घेतला. कापुस विक्री आवारा बाहेर परस्पर दर ठरवुन न करता स्पर्धात्मक लिलावात विक्री करणे भविष्याच्या दृष्टीने शेतकरी हिताचे आहे. आवारात कुठलीही कटती नाही. ज्या त्या दिवशी लिलाव, वजनमाप आणि पेमेंट शेतक-यांना दिले जाते. त्यामुळे बाजारपेठेत कापुस आवक वाढेल असा विश्वास बारामतीचे आडते व्यापा-यांनी व्यक्त केला. मार्केट मध्ये कापुस विक्री सुरू केल्याने भविष्यात कापसाची लागवड वाढणार आहे. त्यासाठी बाजार समिती तर्फे लवकरच कापुस उत्पादकांचा मेळावा घेणार असलेने प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on