बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
142

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८८ वा वर्धापन दिन शनिवार १६ डिंसेबर २०२३ रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजीनाना होळकर, माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव बापु जगताप आणि जवाहरशेठ वाघोलीकर व सभापती सुनिल

पवार यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून व केक कापुन वर्धापन दिन संपन्न झाला. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दि. १६/१२/१९३५ रोजी झाली. समितीची सुरूवात कॉटन मार्केट म्हणुन झाली. समितीचे मुख्य बाजार आवार आणि सुपे व जळोची येथे उपबाजार आवार असा विस्तार वादुन सध्या समितीच्या प्रगतीची वाटचाल सुरू आहे. बारामती मुख्य यार्ड येथे रेशीम मार्केट सुरू असुन रेशीम कोष लिलाव ई-नाम ऑनलाईन पध्दतीने राबविणारे बारामती हे राज्यात पहिले मार्केट आहे. त्यासाठी रेशीम कोष खरेदी विक्री मार्केट व प्रशिक्षण केंद्र प्रकल्प उभारणेत येणार आहे. तसेच जळोची उपबाजार येथे नवीन निर्यात सुविधा केंद्र व ऑफीस इमारत कामे सुरू आहेत. सुपे येथे नवीन जागेत विविध उपक्रम व सुविधा राबविणेत येणार असुन यापुढे ही शेतकरी व व्यापा-यांसाठी भविष्यात सोयी सुविधा पुरविणेस बाजार समिती प्रयत्नशील राहील असे सभापती सुनिल पवार यांनी

प्रस्ताविकात सांगितले. बारामती बाजार समितीने दुरदृष्टी ठेवल्यानेच समितीची वाटचाल ही प्रगतीपथावर आहे. यामुळे समितीस राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. असेच समितीने शेतक-यांचे हिताचे काम करीत रहावे असे मत संभाजीनाना होळकर यांनी व्यक्त करून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यांनी दिल्या.

समितीच्या वाटचालीत बाजार समितीचे माजी सभापती, उपसभापती व सदस्य यांचे ही योगदान आहे. भारत हा कृषि प्रधान देश आहे. बाजार समिती ही ख-या अर्थाने शेतक-यांसाठी काम करीत आहे. ऊस हा सुध्दा शेतमाल आहे. बारामती बाजार समितीने आवारात ऊस उत्पादकांसाठी ऊप रोपांची नर्सरी तयार करून उच्च प्रतिची रोपे उपलब्ध करून द्यावीत. बाजार समिती ही शेतकरी हिताचे काम करीत आहे. शेतक-यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळवुन देणेस बाजारा समितीने सतत प्रयत्नशील राहवे. यामुळे शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल असे मत माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव बापु जगताप यांनी व्यक्त केले.

बारामती बाजार समितीची प्रगती ही शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व इतर बाजार घटक यांचे सहकार्याने सुरू आहे. बाजार आवारात विविध सुविधा व उपक्रम सुरू आहेत असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. ज्येष्ठ व्यापारी जवाहरशेठ वाघोलीकर आणि सुर्यकांत गादीया यांनी यापुर्वीचे मार्केटच्या जुन्या आठवणी सांगुन मार्केटचा आढावा सांगितला.

यावेळी छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवाळे, देखरेख संघाचे चेअरमन अनिल आटोळे, दुध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे, व्यापारी अध्यक्ष संभाजी किर्वे, प्रताप पागळे, राहुल वाबळे, संध्याताई बोबडे, भाजी मार्केट व्यापारी अध्यक्ष सईद बागवान, सहाय्यक निबंधक टांकसाळे साहेब, माजी सचिव शिर्के साहेब, व्यापारी सेल अध्यक्ष वैभव शिंदे, हमाल उपाध्यक्ष शंकरनाना सरक, विविध संस्थाचे पदाधिकारी व सरपंच, विकास सोसायट्याचे चेअरमन तसेच बारामती बाजार समितीचे माजी सभापती, उपसभापती व संचालक तसेच विद्यमान उपसभापती निलेश लडकत आणि सदस्य दत्तात्रय तावरे, सतिश जगताप, शुभम ठोंबरे, बापुराव कोकरे, तानाजी आटोळे, शोभाताई कदम, प्रतिभाताई परकाळे, रामचंद्र खलाटे, संतोष आटोळे, मिलिंद सालपे व समितीचे सेवक तसेच व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी वर्ग उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत सचिव अरविंद जगताप यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचन युवराज देवकाते व विनायक गावडे यांनी केले. तसेच सतिश जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here