बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने हमीदराने हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

0
201

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने हमीदराने हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू

हंगाम २०२२-२०२३ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने चना (हरभरा) खरेदी करणेत येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया दि. ०१/०३/२०२३ ते १५/०३/२०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. सदर चना( हरभरा) प्रति क्विंटल रू. ५३३५/- या हमीभावाने खरेदी होणार आहे. तरी हरभरा उत्पादक शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करावी असे आव्हान बाजार समितीचे प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
हरभरा उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक, बारामती येथे करावे. शेतकरी नोंदणी करीताना सर्व शेतकरी ऑनलाईन पद्धतीने करावयाची असल्याने नोंदणी करण्यासाठी शेतक-यांचे आधारकार्ड, ७/१२ उतारा, ऑनलाईन पिक पेरा, बँकेचे पासबुक IFSC कोड सह झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे शेतक-यांनी सादर करणे आवश्यक आहेत. तरी हरभरा उत्पादक शेतक-यांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करावी. बारामती मार्केट कमिटी मध्ये हरभरा खरेदी सुरू झाले नंतर शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे स्वच्छ व वाळवुन आणावा अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
तरी सर्व हरभरा उत्पादक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समिती बारामती तर्फे करणेत येत आहे. अधिक माहिती साठी सुर्यकांत मोरे मोबा. ९९७०३४०४१२ यांचेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here