HomeUncategorizedबारामती औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार - उद्योगमंत्री उदय सामंत

बारामती औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – उद्योगमंत्री उदय सामंत

बारामती औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने मंत्रालयात आयोजित बैठकीत उपस्थित केलेले विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने एम आय डी सी मध्ये आयोजित केलेल्या उद्योजक संवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील, सदस्य मनोज पोतेकर, महादेव गायकवाड, संभाजी माने, हरिभाऊ थोपटे, चंद्रकांत नलवडे, हरिश्चंद्र खाडे, हरीश कुंभारकर, विष्णू दाभाडे, सूर्यकांत रेड्डी, राजन नायर, बारामती कॅटलफीड्सचे प्रमुख सचिन माने, पंढरीनाथ कांबळे, राजेंद्र साळुंखे यांचेसह बारामती परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती मध्ये एमआयडीसीचे नवीन प्रादेशिक कार्यालय स्थापन करणे, ESIC चे नियोजित शंभर बेड ऐवजी दोनशे बेडचे हॉस्पिटल मंजूर करून त्यासाठी आठ एकर वाढीव जागा एमआयडीसीत उपलब्ध करुन देणे, बारामतीच्या अर्थकारणाला भविष्यात मोठी गती देण्यासाठी Dry Port ची निर्मिती करून कृषी व औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, बारामती एमआयडीसीतील अग्निशमन केंद्राचे आधुनिकीकरण करणे, एमआयडीसीतील भूखंडांचे मूल्यांकन (Ready Recknor) दरातील तफावत दूर करुन उद्योजकांवर पडलेला मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार कमी करणे, पाठीमागील सहा वर्षापासूनचा जीएसटी वसूलीचे अन्यायकारक परिपत्रक रद्द कारणे, पणदरे एमआयडीसीतील उद्योगांसाठी स्वतंत्र वीजपुरवठा यंत्रणा उभारणे, पणदरे सूत गिरणीच्या जागेवर मोठा ऑटोमोबाईल प्रकल्प आणून तेथील लघुउद्योगांना चालना देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनाने शासनाकडे केल्या असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने उपस्थित केलेले सर्व विषय अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यातील बारामतीच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचा सर्वांगीण औद्योगिक प्रगतीचा दूरदृष्टीचा आदर्श राज्यातील इतर औद्योगिक संघटनांनी अवश्य घ्यावा असे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on