बारामतीला विकासाची झालंर …! तर समस्याचा पाढा कायम …!!

0
395

बारामतीला विकासाची झालंर …! तर समस्याचा पाढा कायम …!!

बारामती : (भावनगरी) प्रतिनिधी:-

असे कशामुळे घडते आहे..हो तर जागेवरूनच आपली कामे उरकण्याच्या दृष्टीतून अधिकारी वर्ग सूम झालाय… कोणीही उपट सुंब्याने उठावे व त्या – त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान भरणी करून रस्त्यावर न येता बारामतीच्या समस्येवर जागेवरून काम करायचे अशा धोरणांच्यामुळे ,
यामुळे बारामती शहराच्या , प्रशासकीय भवनातल्या प्रश्नावर, बारामती नगर परिषदेच्या प्रश्नावर,बारामती ट्राफिकच्या बाबतीतले प्रश्न, फेरीवाल्यांचे प्रश्न, गाळाधारकांचे प्रश्न, शाळेच्या आवारांचे प्रश्न, औद्योगिक वसाहतीतील प्रश्न,वीज वितरणाचे प्रश्न, आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवकांचे प्रश्न, बस स्थानकचे प्रश्न ,आरटीओ कार्यालयाचे प्रश्न, शहरातील वाढती गुन्हेगारी तर अवैध् वाढते व्यवसायचा प्रश्न ,काही लोकांचा मनमानी कारभार , व प्रश्न समस्या सुटता सुटेना एवढे असे विचार केल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत.. बारामतीच्या शहराबाबत जागेवरून आदेश देणाऱ्या वरिष्ठ- कनिष्ठ अधिकारी वर्गांच्यामुळे हीच खरी बारामतीच्या विकासाला काळीमा लावणारी बाब समोर येते आहे..!
कुठवर चालणार.. हे असेच हो..!


बारामतीला विकासाची झालंर,तर समस्याचा आजही पाढा कायम… बारामती शहराचा सर्वांगीण विकास होत आहे .
मात्र शहरातील ठराविक रस्ते सोडले आणि इमारती पाहिल्यावर लक्षात येते.
स्वच्छ सुंदर हरित बारामतीचे शहर चहुबाजूने त्या त्या शहरातील मुख्य रस्त्याला गेल्यावर दिसून येत आहे.. बारामतीकर नागरिक खुश आहेत का या सर्व काही विकासावर तर अनेक नागरिक सांगतील आम्ही जाम खूश आहोत. कारण बारामतीच्या सिटीप्रमाणे तालुका दृष्टीने फार मोठा विकास दिसून येत आहे.
येथील रस्ते ,वीज अंडरग्राउंड ,पाणी ड्रेनेज अंडरग्राउंड तर काही ठिकाणची जुनेच उद्याने ठीक ठाक तर विद्या प्रतिष्ठानचा परिसर भिगवन रोड व या रस्त्याला लागून असलेले अंतर्गत रस्त्यांची झालेले डांबरीकरण उल्लेखनीय आहेत. सोबत प्रशासकीय इमारती अधिकाऱ्यांचे टोलेजंग ऑफिसेस जोरदार झाल्याचे दिसून येत आहेत. मूलभूत गरजायुक्त विकास आहेच .
मात्र काही प्रमाणात तर त्या त्या प्रशासकीय दालनात आमदार मंत्री यांच्या धोरणात्मक विचारांचे विचार तशाच प्रमाणात बैठका होतात. काही ठराविक पत्रकारांनाच ठराविक बातम्या कळवल्या जातात, उर्वरित प्रसिद्ध येतात तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व स्थानिक नेते अजित पवार यांच्या विचारांचे शहर याच शहराचा सर्वांगीण विकास झालाय होय. बारामतीचे शहर सुशोभीकरण, हरित, सुंदर आहेच परंतु याच बारामती शहराला म्हणे विकासाची झालंर.. तर समस्यांचा पाढा मात्र कायमचा आहेच…!
तो खालील प्रमाणे काय नाही बारामतीत… आवश्यकता कशाची कमतरता विकासाला अधिक गती देण्यासाठी कशाची अपेक्षा आहे.
येथील मतदाराला काय अपेक्षित हेही जाणून घेणे आवश्यक वाटते आहे.
म्हणून हा आढावा थोडक्यात… ‘भावनगरी” च्या माध्यमातून …तर नवीन बस स्थानक सुरू होणे आवश्यक लवकर.. कारण पावसाळा सुरू आहे.
तात्पुरत्या बस स्थानक ठिकाणी चिखल होतोय पाणी साठवून प्रवासी पडतात अनेक समस्या प्रमाणे अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.!

बारामतीत वाढते नागरिकीकरण.. मतदारापेक्षा अधिकची लोकसंख्येत वाढ ठरतेय डोकेदुखी प्रशासना पुढे,
तर बारामती नगर परिषदेचे खोळंबलेले नियोजनात्मक पर्यायी विकासात्मक सुविधा देण्याच्या करिता अपुऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मनुष्यबळाचा अभाव प्रामुख्याने दमछाक होत आहे. यामुळे सर्वच बारामतीच्या प्रशासकीय तर निमशासकीय ठिकाणी सर्व काही नागरी सुविधा मिळणे कठीण होऊन बसलेले
दिसून येत आहे.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खुर्चीवरून नुसतेच सूचना सल्ले देतात..? अधिकार गाजवतात.. मात्र बारामतीचा विकास पाहता व कनिष्ठांकडून आढावा घेऊन त्यांनी सुचवलेल्या किंवा त्यांच्या कल्पना वरच उपाय योजना होतात.तर अर्धवट स्थितीत इमारती बांधल्या गेलेल्या आहेत..तसेच अनेक लोकायुक्त ,सुविधायुक्त कामे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीत..!
सर्वत्र विधानपरिषदेप्रमाणे गदारोळ होऊन बारामती ठराविक लोक व प्रशासन यांच्या माध्यमातून विविध कल्पनेतून सूचनेवरून नेत्यांच्या आदेशावर व नेत्याला खुश करण्याच्या करिता मग वाटेल ते असा कारभार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे …
काही स्थानिक संस्थेत ही असाच मनमानी कारभार तेथे गेल्यावर तेथील नोकरवर्ग आपापल्या केबिनच्या माध्यमातून कागदपत्रे संस्थेचे कामे होत आहेत काय.. असा प्रश्न निर्माण होतो आहे. अशा असंख्य प्रश्नावर आजही विचार विनिमय होणे प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या करिता लोकहितार्थ जनसेवेचे जीवनावश्यक व वाढत्या नागरिकीकरणाच्या करिता पुढील उद्भभ् वणाऱ्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या करिता आधीच पुढचे विकासात्मक दूरवरच्या दृष्टीचे पाऊल विचारधीन असणे गरजेचे आहे.

बारामतीच्या शहराच्या दृष्टीतून नागरिक प्रशासनाला व नेत्याला आमच्या भावनगरीच्या माध्यमातून चर्चा घडवून आणत आहेत..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here