बारामतीत ॲग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प…!
उद्या शनिवार ११मार्च २०२३ रोजी नितीन गडकरी बारामती दौऱ्यावर..येणार असून
ॲग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती येथील भारतातील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प ( सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र ) सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर ( IVF) लॅबोरेटरी याचे उद्घाटन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे .अन्य मंत्रीगण येणार असल्याचे समजते…!
प्रकल्पातील निर्मितीचे वैशिष्ठ्ये…..!
पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र या प्रकल्पामध्ये देशी गोवंशामध्ये गीर आणि साहिवाल त्या सोबतच म्हैशींमध्ये मुन्हा आणि पंढरपुरी या दोन म्हशींच्या जातींचा समावेश केला गेला आहे. या प्रकल्पात सध्या ( IVF) एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत ब्राझिलियन आणि भारतीय गीर वासरांची निर्मिती करण्याचे काम चालू केले गेले आहे. या प्रकल्पामध्ये अॅनिमल न्यूट्रिशन, जेनेटिक्स, डिसीज डायग्नोस्टिक, एम्ब्रियो ट्रान्सफर (IVF ) या विभागाच्या जागतिक दर्जाचे आधुनिक प्रयोगशाळा आहेत.
उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली.
भारतातील दुग्ध व्यवसाय हा सुद्धा या सर्व बाबतींमध्ये साक्षर आणि सशक्त करण्याकरता या तंत्रज्ञानाचा अवलंब या प्रकल्पामध्ये केला आहे. जेणेकरून सिईंग इज बिलिव्हिंग या तत्त्वानुसार ज्ञान आणि कौशल्य हे दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, महिला, नवीन उद्योजक, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन संबंधित कंपन्यातील तज्ञ, यांना आत्मसात करता येईल असे मत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे व प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी व्यक्त केले.