बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेचे सर्व दुकाने बंद :- अध्यक्ष सुधाकर माने

0
19

बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेचे सर्व दुकाने बंद :- अध्यक्ष सुधाकर माने

बारामती 30 सोमवार रोजी
सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन – मुंबई येथे असल्यामुळे बारामतीतील सर्व दुकाने बंद राहतील असे बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, सुदाम कडणे, किरण कर्वे यांनी बारामती तालुका संघटनेच्या वतीने माहिती दिली आहे.

सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन – संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा.

नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर रोजी सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेणार असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली.

शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.

13 सप्टेंबर 19 रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून दि.05 जाने 2024 रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे, परंतु कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही.

त्यामुळे शासनाने 5 वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक तरी दिनांक 30 सोमवार रोजी अजित दादा पवार यांनाही भेटणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

समाजाची झाले आहे. म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here