बारामतीत सुनेत्रा पवारांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे

0
64

बारामतीत सुनेत्रा पवारांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे

बारामती- प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रचारप्रमुखाची नियुक्ती केली जाणार असून बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी बाळासाहेब तावरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात भरला जाणार आहे. या अगोदर सकाळी साडेनऊ वाजता पुणे जिल्हा परिषदेजवळ पुना क्लबच्या समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे ही येणार आहेत तसेच खासदार मेघा कुलकर्णी, रुपाली चाकणकर, प्रदीप रावत, अनिल शिरोळे, संजय काकडे, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्यासह आमदार दत्तात्रय भरणे, भीमराव तापकीर, दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, राहुल कुल, सुनील शेळके, अतुल बेनके, सुनील टिंगरे, चेतन तुपे, माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, सिध्दार्थ शिरोळे, सुनील कांबळे, अण्णा बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती किरण गुजर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here