HomeUncategorizedबारामतीत सायकल स्पर्धा सायकलिंग स्पर्धेत १७४ सायकलपटूंचा सहभाग..!

बारामतीत सायकल स्पर्धा सायकलिंग स्पर्धेत १७४ सायकलपटूंचा सहभाग..!

बारामतीत सायकल स्पर्धा सायकलिंग स्पर्धेत १७४ सायकलपटूंचा सहभाग..!

बारामतीत सायकल स्पर्धा …!

सायकलिंग स्पर्धेत १७४ सायकलपटूंचा सहभाग

बारामती (प्रतिनिधी ) ; सायकलिंग

संघटना ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेस बारामती येथे होत असलेल्या स्पर्धेत यांत १७४ सायकलपटूंनी भाग घेतला आहे.

बारामती येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डायमेक्स कंपनी शेजारून लिमटेक गावाच्या

दिशेला जाणाऱ्या सुमारे सात कि.मी. अंतराच्या मार्गावर २४ तारखेपर्यंत ही स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा युथ गट (१२ ते १४ वर्षे), सबज्युनियर गट (१५ आणि १६ वर्षे), ज्युनियर (१७ व १८ वर्षे) मुले व मुली, ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यावरील वयोगट) आणि २३ वर्षांखालील पुरुष (२३ वर्षे) अशा एकूण नऊ वयोगटात होणार आहे. यांत इंडीव्युजल टाइम ट्रायल आणि मास स्टार्ट व रोड रेस अशा दोन प्रकारात ही स्पर्धा होईल यांत

आंतरराष्ट्रीय पदकविजेते सायकलपट्टू कोल्हापूरची पूजा दानोले, राष्ट्रीय पदक विजेती व एमटीबी सायकलिंगमधील आंतरराष्ट्रीय पदक विजेती, नगरचा पेमराज सारडा महाविद्यालयाची प्रणिता सोमण, नाशिकची ऋतिका गायकवाड, कोल्हापूरची रंजिता घोरपडे, बारामतीची राधिका दराडे, नवी मुंबईची स्नेहल माळी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची आदिती डोंगरे, जळगावची आकांक्षा म्हेत्रे यांच्यासह पुरुषांमध्ये राष्ट्रीय पदक विजेता पिंपरी चिंचवडचा

सूर्या थात्तु, पुण्याचा अदीप वाघ, प्रणव कांबळे, मुंबई शहरचा विवान सप्रू, नागपूरचा तेजस धांडे या प्रमुख खेळाडूंचा सहभाग आहे.

या स्पर्धेतून विजयपूर (कर्नाटक) येथे नऊ ते तेरा जानेवारी २४ दरम्यान होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे, अशी माहिती सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांनी दिली.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on