Homeभावनगरी डायरीबारामतीत श्री.संतश्रेष्ठ श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी…

बारामतीत श्री.संतश्रेष्ठ श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी…

बारामतीत श्री.संतश्रेष्ठ श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी…

बारामतीत श्री.संतश्रेष्ठ श्री. सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी…

बारामती प्रतिनिधी:-

बारामतीत श्री. संतश्रेष्ठ श्री.संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा यंदा बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने भिगवन रोडला लागून असलेले वीर भाई कोतवाल सोसायटी येथे बारामतीतील सर्व नाभिक बांधवांच्या उपस्थितीत श्री. संतश्रेष्ठ श्री .संतसेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सत्यनारायण महापूजा,तर प्राध्यापक वेदांतचार्य श्री.ह. भ. प. शरदचंद्रजी महाराज शास्त्री आळंदीकर यांचे सुश्राव्य कीर्तनातून त्यांनी सांगितले की शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे. शिक्षणाला अध्यात्माची जोड नसेल तर तुमच्या पद- पदव्या काही कामाच्या नाहीत.जर विद्यार्थ्याला शिक्षण आणि अध्यात्माची जोड असेल तर तो विद्यार्थी फेल जाणार नाही.

त्यामुळे त्यामागे वेगळीच दैवशक्ती संस्कारमय असेल असे किर्तनातून सागितले. तसेच या कीर्तनाला वादक- गायक, बारामती पंचक्रोशीतील भजनी मंडळी श्री. भैरवनाथ भजनी मंडळ उंडवडी क.प.यांची साथ लाभली. तदनंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला. फुले टाकून झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक , व नाभिक समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ज्येष्ठ नाभिक समाज बांधव खालीलप्रमाणे सत्कार मूर्ती-
ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
भास्करराव वाघ, भारत माने, पंडित दळवी, नारायण वाघमारे, अनिल दळवी ,तुकाराम शिंदे, बलभीम चौधरी, रवींद्र सूर्यवंशी, सुनील माने, नंदकुमार पोळ, संभाजी काशीद, किसन कढणे, पांडुरंग काशीद, प्रा.सुरेश साळुंके सर, पै. सुधाकर माने वस्ताद, अजय सूर्यवंशी, सुभाष खांडेकर, रमेश पोफळे, सुनील जगताप, बापू काशीद .
नाभिक समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले यांचा सत्कार खालील प्रमाणे सत्कारमूर्ती:-
(प्रा. डॉ. रामचंद्र सपकाळ उपप्राचार्य तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती ,)तसेच
(श्री प्रकाश बलभीम चौधरी मिलिटरी तील हवालदार या पदावरून रिटायर तसेच ते भारतीय सेनेमध्ये एकूण सेवाकाळ २२ वर्षे ६ महिने तसेच E.M.E या कोर मध्ये संपूर्ण सेवाकाळ पूर्ण केल्याबद्दल.)
(श्री.प्रज्वल रवींद्र राऊत देशातून 6वा नंबरवर लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल .)
(सौ. पुनम सुदाम कढणे मॅडम यांचा कवी मोरोपंत शिक्षण संस्था बारामती यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल .)
(माळेगाव कॉलेज येथील डॉ. सोमनाथ हनुमंत कढणे सर यांनी पी.एच.डी केल्याबद्दल .)

(पै.सागर सुधाकर माने यांची राष्ट्रीय स्तरावर कुस्तीगीर क्षेत्रात N.O.C कोच या पदी निवड झाल्याबद्दल .)

(प्राध्यापक कु.सायली कालिदास जाधव यांची टी.सी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदी निवड झाली तसेच M.S.C मायक्रोबायोलॉजी 2022 -23 यावर्षी 82.54 % प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल..)

(सौ.राजश्री चैतन्य जाधव (कर्वे) यांनी फर्ग्युसन कॉलेज येथे 2019 रोजी M.C.S पदवी घेतली.व सध्या त्या (Keisanki) केसांकी टेक्नॉलॉजी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत बद्दल..)
(सध्या अकरावी सायन्स मध्ये शिकत असलेला…
चि. श्रीशकुमार संतोष शिंदे याने राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धत द्वितीय क्रमांक विविध गड किल्ले सायकलीवरून सर केलेत .तसेच जलतरण,रनिग अशा स्पर्धामध्ये ,तर आर्यनमॅन बरोबर कमबॅक तसेच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल आणि सायकल रनिंग स्विमिंग या तीन पैकी स्पर्धेत नॅशनल खेळण्यासाठी त्याच्यातील जिद्दीसाठी शुभेच्छा. )
(कु. वैष्णवी महादेव कडणे मेकअप आर्टिस्टमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल .)
(कु. दिक्षा किरण चौधरी यांची M.B.B.S सांगली भारतीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी पुढील प्रशिक्षणासाठी ऍडमिशन मिळाले बद्दल.)
(कु. प्रियांका गोपाल सोनवणे यांची युनियन बँक फिल्ड ऑफिसर पदी जळगाव भुसावळ शाखा या ठिकाणी नियुक्ती बद्दल .)
(कु. ज्ञानेश्वरी विजय चौधरी B.A.M.S वैद्यकीय शिक्षण बेंगलोर येथे घेत आहे. बद्दल..)
(चि.प्रणव विजय चौधरी
याची राज्यस्तरावरून प्रथम क्रमांकाने निवड होऊन B.E मेकॅनिकल इंजिनियर मधून एम टेक न्यूरोलॉजी शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी शिलॉंग (मेघालय) येथे निवड झाल्याबद्दल) यासर्वाचे तसेच-
सन 2023 गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींचे सत्कार समारंभाची नावे पुढीलप्रमाणे- चि.पृथ्वीराज प्रशांत यादव 5 वी 90%
कु.ज्ञानेश्वरी अनिल जाधव 5 वी 92%
कु.श्रुती हरिहर जाधव 6 वी 94%
कु.ईश्वरी सुदाम कढणे 7वी 95.50%
कु.स्वराली विवेक जाधव 8 वी 80%
कु. प्रचिती रणधीर काशीद 8वी 80%
चि.श्रेयस हरिअर जाधव 9 वी 81.50%
चि.यश बापू साळुंके 10वी 75%
चि.आदित्य अनिल गवळी 10वी 91.80%
चि.अथर्व किशोर माने 10 वी 81%
कु.गायत्री संतोष यादव 10 वी 81%
कु. जान्हवी प्रशांत रणदिवे 10वी 84.80% चि.निखिल मनोहर जाधव 10वी 83.80%चि.तुषार मनोहर जाधव 10वी 70.20% चि.आर्यन रामदास राऊत 10वी
83.20% कु.ऋतुजा किशोर माने 12वी सायन्स 86% या सर्व नाभिक समाजातील ज्येष्ठ मान्यवराचे व विद्यार्थी विद्यार्थिनीचे सत्कार बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सत्कार शाल, श्रीफळ, ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वरील सर्वांचे गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन सर्व बारामती तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,कार्याध्यक्ष, सचिव ,खजिनदार व सर्व सदस्य , सर्व सल्लागार मार्गदर्शक मंडळ :-अध्यक्ष पै.सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कढणे , कार्याध्यक्ष प्रा सुरेश साळुंके , खजिनदार गणेश चौधरी, सचिव किरण कर्वे, सहसचिव किसन भाग्यवंत,
प्रसिद्धीप्रमुख संतोष शिंदे,सदस्य श्रीपाद राऊत,अनिल जाधव, महादेव साळुंके, बापूराव साळुंके, गणेश काळे ,अमोल राऊत ,आकाश काळे,
सल्लागार ,अनिल दळवी, हेमंत जाधव, महेश वारुळे, महेंद्र यादव ,किरण चौधरी, नवनाथ आपुने, राजेंद्र शिंदे, राधेश्याम साळुंके ,रवींद्र सूर्यवंशी ,नारायण वाघमारे. यांनी पुण्यतिथी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.तर सर्व नाभिक समाज बांधव ,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संतश्रेष्ठ श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथीचा सोहळा साजरा करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी , प्रा.सुरेश साळुंखे ,सुदाम कडणे यांनी केले. तर आभार वीरभाई कोतवाल सोसायटीचे रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले. यानंतर महाप्रसादाचा भोजन कार्यक्रम पार पडला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामतीत श्री. संतश्रेष्ठ श्री.संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on