प्रतिनिधी: बारामतीत जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी….!

“होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी.”
पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ४०० वर्षापूर्वी लाखों मानक यांच्या त्यागातून पराक्रमातून आणि बलिदानातून रयतेचं स्वराज्य उभ राहिल. स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांसोबत जे काही वीर मावळे आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढले, त्यापैकीच स्वराज्याचे अनमोल रत्न म्हणजे जिवाजी महाला होय…
वीर जिवाजीचा जन्म प्रतापगडच्या पायथ्याजी मु. पो. कोडवली जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देवजी महाला या आप्ताने केल्यामुळे त्यांचे आडनाव महाला असे पडले, बालपणापासूनच जिवाजी हे साता-याच्या तालमीतला, लाल मातीत मेहनत करणारा तयार होऊ लागला.
जोर, बैठका, तलवारबाजी, उपजधज बालपणी याच शिक्षण त्याना मिळाले. जिवाजी दांडपट्टा तर असा फरिवायचे की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाने ते डोळ्याचे पाते लबते न लवते तोवर दोन तुकडे करायचे. उंच उड्या मारण -यात तर ते निष्णात होते. उडी मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे.

तरणाबांड, मान जाड पिळदार मिशा, सरळ नाक, भले मोठे कपाळ आणि तीक्ष्ण मेदक नजरेचा जिवाजी पाहताच शत्रूलाही कापरे मायचे. असे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शिवरक्षक जिवाजी महाले होय.. या लढाऊ जिगरबाज योध्याची यांची आज जयंती निमित्त बारामतीत..
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने वार सोमवार दिनांक ०९/ऑक्टोबर रोजी शूरवीर शिवरत्न शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त बारामती येथील शिवरत्न जिवाजी महाले चौक पाटस रोड , रिंग रोडला पाणी साठवण तलावाच्या शेजारी आज सकाळी ०९ ऑक्टोबर सोमवार रोजी शूरवीर जीवाजी महाले जयंती नमित्ताने जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस गुलाल,फुले पुष्पहार घालून, पेढे वाटून जयंतीस् विनम्र अभिवादन करून , घोषणा देण्यात आल्या,तर सर्व नाभिक समाज बांधवांनी अशा प्रकारे जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष.सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कढणे सर, कार्याध्यक्ष प्रा सुरेश साळुंके सर, सचिव किरण कर्वे, सहसचिव किसन भाग्यवंत, खजिनदार गणेश चौधरी, प्रसिद्धीप्रमुख संतोष शिंदे, जिवाजी महालेंचे वंशज दत्तात्रय सपकळ,संभाजी सपकळ, जयदीप सपकळ, तन्मय सपकळ, शिववर्धन सपकळ, भाई कोतवाल सोसायटीचे चेअरमन रवींद्र सूर्यवंशी, सोसायटीचे सचिव सुनील माने, चंद्रकांत यादव सर, मारुती दुधाळ, शिवाजी राऊत, नवनाथ देवकर, होलार समाज संघटनेचे मा.हिरामण माने साहेब आदी मान्यवर समाजबांधव कार्यक्रमास उपस्थित होते.