बारामतीत लम्पी रोखण्यासाठी बाजार समितीतर्फे उपायोजना
बारामती, जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे प्रतिबंध नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील आहे. जनावरे बाजार आवारात जनावरे विक्रीसाठी आणताना लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती सुनील पवार, उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.
रोगाचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे बाजारात जनावरे विक्रीस आणताना रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण किमान २८ दिवसांपूर्वी केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले
याशिवाय शेतकरी व व्यापाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला बाजार समितीस सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी व व्यापारी यांनी आपली निरोगी जनावरे विक्रीस आणावीत, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.