बारामती :- गुनवडी चौक ते इंदापूर चौकातील रोडवर असलेली अतिक्रमणे मागे घेतली.
या परिसरात ग्राहकांची सुद्धा गर्दी असते. छोटे-मोठे व्यवसायिक हे रोडचे कडेला व्यवसाय करण्यासाठी बसतात त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामती वाहतूक शाखेचे सर्व अंमलदार आणि बारामती नगरपरिषद चे कर्मचारी यांना सोबत घेऊन गुणवडी चौकातील आणि गुनवडी चौक ते इंदापूर चौकातील रस्त्यावर आलेले सर्व छोटे-मोठे अतिक्रमण हे नगरपालिकेने लावलेले स्टीलचे पिलर चे आत मध्ये बसवून घेतले. कारवाई आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत करण्यात आली. तसेच यापुढे वारंवार सांगून सुद्धा रोडवर आल्यास कारवाई करणार असल्याबाबत सूचना दिल्या.
छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी आपला व्यवसाय करावा परंतु वाहतुकीस अडथळा होईल अशाप्रमाणे आपले साहित्य रोडवर मांडू नये..
– चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक बारामती वाहतूक शाखा.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक पोलिस जवान प्रशांत चव्हाण,सुभाष काळे, सुधाकर जाधव,स्वाती काजळे,श्रीधर कांबळे,अजय पिठलेवाड आणि बारामती नगरपालिकेचे अनिल सरोदे, सागर भोसले, किरण साळवे, संदीप किरवे, तानाजी कदम, गौतम खरात, विनोद गुळवे, सागर गायकवाड, बंटी साबळे यांनी केली आहे.