बारामतीत क-हावागज येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार…!
प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या अंतर्गत कार्यान्वित होणार आहे.
महत्त्वाची बाब
महाविद्यालयासाठी बारामती तालुक्यातील करहावागज येथे 82 एकर जमीन निश्चित करण्यात येणार …!
यामध्ये 50 एकर खाजगी जमीन आणि 7 एकर गावठाण जमीन समाविष्ट आहे.
मनुष्यबळ आणि भरती:
या महाविद्यालयासाठी 276 पदे मंजूर करण्यात आली आहेत.
यात 96 नियमित पदे आणि 180 कंत्राटी व बाह्य स्त्रोतांद्वारे भरावयाची पदे असतील.
आर्थिक तरतूद: पुढील 5 वर्षांसाठी एकूण ₹1071.993 कोटी (₹10,719.93 लाख) खर्च मंजूर करण्यात आला आहे.
यात मनुष्यबळासाठी ₹974.893 कोटी (₹9,748.93 लाख) आणि कार्यालयीन खर्चासाठी ₹97.1 कोटी (₹971 लाख) चा समावेश आहे.
इमारत बांधकामासाठी ₹525.32 कोटी, उपकरण खरेदीसाठी ₹38.50 कोटी आणि वाहन खरेदीसाठी ₹0.76 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
महाविद्यालय सुरू होण्याचा कालावधी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाविद्यालय सुरू होणार आहे.
महत्व आणि परिणाम:
पशुपालकांना उत्तम पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.
पशुधन उत्पादन आणि दुग्धउत्पादन वाढीस मदत होईल. राज्यातील पशुवैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होईल आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या वाढेल.
राज्य शासनाने हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून, त्यासाठी आवश्यक अनुदान आणि जमीन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
