बारामतीत ऑल इंडिया संपादक संघाचा प्रथम वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा….

बारामतीत ऑल इंडिया संपादक संघाचा प्रथम वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा....

0
103

ऑल इंडिया संपादक संघाचा प्रथम वर्धापन दिन बारामतीत सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

बारामती: ऑल इंडिया संपादक संघाचा दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी प्रथम वर्धापन दिन देशभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.पुणे जिल्हा व बारामती कार्यकारिणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथिल मीटिंग हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांच्या उपस्थितीत बारामती तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र जगताप यांच्या वतीने उपस्थित संपादक पत्रकांरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सोमनाथ कवडे,सुनील शिंदे,गौरव अहिवळे,शुभम अहिवळे यांनी पत्रकारांच्या समस्या यावर सखोल चर्चा करत ऑल इंडिया संपादक संघाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी बोलताना सांगीतले की राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया संपादक संघाचे संघटन महाराष्ट्र राज्यात मजबूत झाले असून संपादक पत्रकारांच्या हक्कांसाठी व समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत आहे.


यावेळी नविन पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आले ऑल इंडिया संपादक संघ बारामती कार्यकारणी पदाधिकारी भिमसेन उबाळे,महेंद्र गोरे,संदिप साबळे, भीमसेन उबाळे, फिरोज शेख, दशरथ मांढरे,साजन अडसुळ,सुरज देवकाते,निलेश जाधव तसेच पत्रकार सोमनाथ कवडे, सुनिल शिंदे,उमेश दुबे,लक्ष्मण भिसे,राजू कांबळे,मन्सुर शेख,शुभम अहिवळे, अमित बगाडे,भारत तुपे सामाजिक कार्यकर्ते शैलेश खरात, निखिल खरात,अस्लम शेख अदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here