बारामतीत “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” संपन्न

बारामतीत “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” संपन्न

0
112

प्रतिनीधी :- विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांच्या सयुक्त विध्यमाने “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” यशस्वीरीत्या संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नव क्रांती सेवाभावी संस्था बारामती, यांच्या संयुक्त विध्यमाने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये हा उपक्रम राबविण्यात. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा. श्री. धनंजय जमदार, अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन, मा. श्री. निलेश काटे, सरचिटणीस राष्ट्रीय युवक कॉंग्रेस सातारा, मा. श्री. रमाकांत गायकवाड, माजी विभाग नियंत्रण रा. प. पुणे तसेच मा. श्री. प्रकाश तांबडे, सचिव मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे मा. श्री. भाऊसाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष अहमदनगर मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य तसेच प्राचार्य मा. डॉ. श्री. आर. एस. बिचकर आदी मान्यवर या कार्यक्रमास लाभले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवराना सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. चक्रपाणी चाचर व श्री. दिपक वाबळे यांनी केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा समाजातील उपेक्षित, कष्टकरी व अत्यंत बिकट परिस्थितीतून कणखरपणे उभ्या राहिलेल्या समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा व त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणे हा होता. या कार्यक्रमामध्ये आदर्श माता पिता पुरस्कार:- श्री. राजेंद्र ज्ञानदेव गवळी व श्रीमती कौशल्या राजेंद्र गवळी, श्रीमती सुवर्णा रवींद्र फडणीस, श्रीमती लता बाळासो गायकवाड, श्रीमती अनिता प्रकाश तांबडे, श्रीमती विमल भाऊसाहेब जाधव, श्रीमती मनीषा अशोक करे, श्रीमती हिराबाई सखाराम वायसे, श्रीमती अंजना हनुमंत कढणे, श्रीमती आश्विनी किशोर नाझिरकर, श्रीमती संगीता राजेश सकट, श्रीमती छाया दिलीप धाईंजे, श्रीमती मनीषा पांडुरंग कोतवळ, वीर पत्नी पुरस्कार:- श्रीमती ललिता संदीप इथापे, आदर्श शिक्षक पुरस्कार- श्री. विलास मुरलीधर तावरे, श्री. संजय मोहन वाबळे, श्री. ज्ञानदेव सिताराम सस्ते, श्रीमती माधवी प्रवीण शेटे, श्रीमती सुजाता गुंडूराव शिंदे, आदर्श पत्रकार व शिक्षक पुरस्कार:- श्रीमती शुभांगी राहुल बनकर, गुणवंत डॉक्टर पुरस्कार:- डॉ. सोनाली पंढरीनाथ खाडे, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार:- कुमारी समृद्धी प्रवीण सावंत, कुमारी स्वराली संदीप इथापे, कुमारी मानसी शंकर नाळे, आदर्श सरपंच पुरस्कार:- श्रीमती अरुणा विजय जाधव, आदर्श शिल्पकार पुरस्कार:- श्री. श्रीनिवास संतोष काळे, गुणवंत पाल्य पुरस्कार:- शुभम मोहन जाधव, गुणवंत कलाकार पुरस्कार:- श्री. जगदीश जाधव, श्री. पियुष सजगणे, श्री. प्रदीप थोरात, श्री. प्रतिक शिंदे, श्री. दत्तात्रय जगताप आदींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी व पुरस्कार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमात ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले अशा सर्वांचे मनापासून कौतुक केले. तसेच हे सन्मानार्थी समाजाची उर्जा आहेत अशा प्रकारची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. श्रीमती पल्लवी बोके व श्री. दिपक वाबळे यांचे महत्वपूर्ण असे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नव क्रांती सेवाभावी संस्था बारामतीच्या खजिनदार श्रीमती मंजुश्री शिंदे यांनी केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here