बारामतीत अभिरूप स्पर्धा परीक्षेचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात..!

0
10

बारामतीत अभिरूप स्पर्धा परीक्षेचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात..!

बारामती प्रतिनिधी ; अभिरूप स्पर्धा परीक्षेचा गुणगौरव सोहळा नुकताच न्यू अक्षता धनाई मंगल कार्यालयात पार पडला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री सचिन सेठ सातव, बारामती ,नगराध्यक्ष. यांच्या पत्नी डॉ.सुहासिनी सातव या उपस्थित होत्या. तसेच अश्विनीताई सातव नगरसेविका, माजी नगरसेवक सुरज शेठ सातव ,श्री. क्लासेस फलटणचे संचालक श्रीकांत साळुंखे सर, प्रशांत हेळकर सर आणि वसतिगृह विद्यालय,का-हाटीच्या प्राचार्या सौ कदम मॅडम उपस्थित होत्या . अभिरूप परीक्षेला तालुक्यातून १६०० विद्यार्थी बसले होते व बीडीएस ला २५० विद्यार्थी होते. यामध्ये २४ विद्यार्थी राज्यातून, ४६ विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीत आणि १०६ विद्यार्थी केंद्राच्या गुणवत्ता यादीतआले आहेत .तसेच बीडीएस परीक्षेमध्ये १८ गोल्ड मेडल,२४ सिल्वर मेडल व ३२ ब्रांझ मेडल विद्यार्थ्यांना मिळाले या सर्वांसाठी कौतुक सोहळा घेतला होता. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले व बीडीएस परीक्षेत असलेले गुणवंत विद्यार्थी यांना मेडल्स देण्यात आले .यामध्ये काही मान्यवरांनी भाषण करून मुलांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या परीक्षेच्या समन्वयका व प्रगती क्लासेसच्या संचालिका सौ राऊत मॅडम यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. या परीक्षेचे आयोजन करण्याचे कारण म्हणजे मुलांना अभ्यासाचे आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि कोणत्याही परीक्षेची भीती त्यांच्या मनातून निघून जावी एवढाच उद्देश आहे. तसेच मुलांना मार्गदर्शन करताना सुहासिनी सातवताईंनी सांगितले की सोशल मीडियापासून मुलांना लांब ठेवावे .तसेच अध्यक्ष भाषणामध्ये अध्यक्षांनी सांगितले की ,पालकांनी मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे तपासा तसेच त्यांचा रोज थोडा वेळ अभ्यास घ्या आणि त्यांना मैदानात थोडावेळ खेळू द्या. अशा पद्धतीने प्रत्येकाने मुलांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले, अगदी आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या कार्यक्रमाचा समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here