बारामतीतील दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा….!

बारामतीतील दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा….!

0
151

बारामतीतील दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा….!
: बारामती संतोष शिंदे

:बारामतीची दहीहंडी जोरदारच होणार यावर्षी आणि त्याच धर्तीवर अनेक बारामतीच्या दहीहंडी उत्सव मंडळाने तयारी केली होती बरं…
पुणे मुंबईच्या दहीहंडी उत्सवाला मागे टाकेल असाच दहीहंडी उत्सव बारामती शुक्रवार दी. ८ रोजी साजरा करण्यात आला.
तसा बारामती दहीहंडी संघाचा उत्सव नावलौकिक राज्याच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतोच दरवर्षी. बाहेरगावी जाऊन अनेक बारामती व पंचक्रोशीतील मंडळे दहीहंडी फोडतात. तेथेही आपली चुरस कायम ठेवतात.

बारामतीत ही आपली चूक कायम दहीहंडी उत्सवाच्या दिवशी बारामतीकरांना पाहायला मिळते.

बारामती पंचक्रोशीतील कृष्ण गोपाल भक्त यामध्ये सहभाग घेतात. ह्यो सण आनंदात मोठ्या जल्लोषात दहीहंडी गोपाळकाला साजरा करतात. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून त्यामुळे बारामतीकरांची दहीहंडी उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात आजवर प्रसिद्धीस राहिलेला आहेच. यंदाही बारामतीत आगळे वेगळ्या पद्धतीत मोठे मनोरे लावून दहीहंडीचा फोडण्याचा उत्सव पार पडला.
बारामतीच्या एमआयडीसीतील पेन्सिल चौकात, सिटिन चौक, पंचायत समिती समोरील हंगे चौक, भिगवन चौक, तीन हत्ती चौक ,सुभाष चौक, गांधी चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, कसबा तसेच शहरातील अन्य भागात ही दहीहंडी उत्सव जोरदार मोठ्या उत्साहात जल्लोषात विविध डान्स – डान्सर साऊंड सिस्टम, डीजे तर डिजे वर थरारणारी तरूणाई डान्सर… तर काही ठिकाणी परंपरेनुसार सुसंस्कृत,तर संस्कृती रित्या दहीहंडी फोडताना मात्र सर्वत्र सारखाच जल्लोष बाल गोपालाचा कृष्ण भक्तांचा पाहिला मिळाला.


पुन्हा एकदा बारामतीची दहीहंडी उत्सव दणक्यात मोठ्या उत्साहात जल्लोषमय रित्या साजरा करताना कृष्ण गोपाळ भक्त मंडळी दहीहंडी फोडतानाचे पाहिला मिळाले. आगळावेगळा असाच आनंदीमय सोहळ्याचे वातावरण दहीहंडी पाहतानाचा बारामतीकरांनाही आनंद डोळ्यात भरताना मावत नव्हता,वातावरण आनंद अनुभवांयला त्यानिमित्ताने मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here