बारामतीतील गणेश मार्केट परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे त्रस्त
बारामतीतील गणेश मार्केट भाजी मंडईजवळील गणेश मंदिरासमोरील नगरपालिका टॉयलेट गेल्या दोन दिवसांपासून धुतले गेले नसल्याने परिसरात मोठ्या दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे मार्केटमधील व्यावसायिक तसेच ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
व्यावसायिकांनी याबाबत नगरपालिका कार्यालयात अनेकदा तक्रारी केल्या असूनही स्वच्छतेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. परिस्थिती जसाच्या तशीच राहिल्याने येथील गाळेधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मार्केटमधील स्वच्छतेसंदर्भात नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी व्यावसायिक आणि ग्राहकांकडून केली जात आहे.