बारामतीच्या सूर्यनगरीत ‘घरफोडी’ करणारा अटक..

0
3

बारामतीच्या सूर्यनगरीत ‘घरफोडी’ करणारा अटक..

बारामती तालुका पोलिसांची कारवाई; गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणारा आणि विकत घेणारा आरोपी जेरबंद

बारामती दि.२२

  बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास  केल्याच्या दोन घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आणि ११ जानेवारी रोजी दुपारी घडल्या होत्या. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
  फिर्यादी श्रीकांत अशोकराव बिरादार (वय ३३ रा.सूर्यनगरी, बारामती) हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे पाहिले. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत असून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच अंदाजे १० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

पत्नी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुलाला खेळवण्यासाठी खाली रस्त्यावर घेऊन गेल्या असताना घराचा दरवाजा पुढे लावलेला होता. याच वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली आली आहे.
यामध्ये सोन्याचे मिनी गंठन (१७.५ ग्रॅम) रु.५०,०००, सोन्याचे काप (८ ग्रॅम) रु.२०,०००, सोन्याचे एअररिंग (४ ग्रॅम) रु.१०,०००, दोन सोन्याच्या अंगठ्या (६ ग्रॅम) रु.१०,०००, चांदीचे पैंजण रु.१,०००, रोख रक्कम रु.१०,००० असा एकूण अंदाजे किंमत २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. या प्रकरणी भा.न्या. संहिता कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेंद्र वामनराव चव्हाण वय 48 वर्षे व्यवसाय मेस राहणार सुमन रेसिडेन्सी फ्लॅट नं. 3 सूर्यनगरी ता. बारामती यांच्याही घरी अशाच घटना होऊन ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरी झाले होते.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांदुळवाडी (ता. बारामती) येथून ऋषिकेश विजय कोकाटे (वय २१, रा.अंबिका नगर,इंदापूर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय २५ रा.व्यंकटेश नगर, इंदापूर) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनार कोलते यालाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार केदारनाथ बिडवे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे मनोज पवार जितेंद्र शिंदे राहुल मखरे सुरेश लांडगे स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवाळे अभिजीत एकशिंगे यांनी केली आहे.

Previous articleबारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने नवमतदार नाव नोंदणी अभियान…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here