Homeलेखबारामतीच्या सलून व्यवसायकाचा आगळावेगळा विक्रम…कपिल शरद माने…. याने चक्क सायकल वरून अष्टविनायक...

बारामतीच्या सलून व्यवसायकाचा आगळावेगळा विक्रम…कपिल शरद माने…. याने चक्क सायकल वरून अष्टविनायक दर्शन….!

बारामतीच्या सलून व्यवसायकाचा आगळावेगळा विक्रम…कपिल शरद माने…. याने चक्क सायकल वरून अष्टविनायक दर्शन….!

बारामतीच्या सलून व्यवसायकाचा आगळावेगळा विक्रम…

कपिल शरद माने…. याने चक्क सायकल वरून अष्टविनायक दर्शन….!

बारामती काहीतरी वेगळं करण्याच्या मूडवर असते. असंच काहीतरी वेगळं करणार नाही तो कसला बारामतीकर हो….

त्याच्या मनात आलं ,’त्याने ठरवलं व त्याने ते पूर्ण केले. असाच एक सायकल वेडा अवलिया …. म्हणजे आपल्या सर्वांच्या ओळखीचा चेहरा
सायकल स्वार कपिल शरद माने…. याने चक्क सायकल वरून अष्टविनायक दर्शन…. करण्याचे सहज मनात ठरवले व त्याने तो पराक्रम केला आहे…

बारामतीच्या कपिल शरद माने याने … चक्क ५ दिवसात सायकल वरून अष्टविनायक दर्शन….!
कपिल माने यांनी
बारामतीत सलून व्यवसाय करत, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत… त्यांनी सायकल चालवण्याची आवड , छंद ,नाद याच्या जोरावर सायकलवरून चक्क ५ दिवसात अष्टविनायक गणतीबाप्पाची दर्शन घेतले…!

ते सांगतात व लिहितात त्यांच्या शब्दातून वाचूयात त्यांचीही पाच दिवसाची अष्टविनायक परिक्रमा… त्यांना आलेला तो अनुभव त्याच्या तोडून…
॥ श्री गणेशाय नमः॥
प्रथमतः महाराष्ट्र व जगभरातील तमाम गणेश भक्तांना व सायकल स्वरांना निर्विघ्नपणे अष्टविनायक दर्शन यात्रा करण्यासाठी व उत्कृष्ट अष्टविनायक दर्शन महामार्ग बनविल्या बद्दल माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती कडुन व आजपर्यंत अष्टविनायक दर्शन पुर्ण करणा-या सर्व सायकलप्रेमींकडुन भारत देशाचे रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब आपणास मानाचा सलाम व मनापासून आभार.

       विशेष आभार : श्री श्रीनिवास वायकर सर.

         संकल्पना व शब्दरचना :‌ श्री कपिल माने 

    ( अष्टविनायक दर्शन सोहळा पुर्ण अंतर 721 कि.मी )

तरी हा अष्टविनायक दर्शन सोहळा आपणासमोर शेअर करण्यासाठी जरा उशीरच झाला. ब-याच दिवसांपासुन एकदातरी सायकलवर अष्टविनायक दर्शन पुर्ण करण्याचा मानस होता परंतु तो काहीना काहीतरी अडचणींमुळे तो रद्द करण्यात येत होता पण या वर्षी दिवाळी मध्ये अखेर तो योग आला मग काय चार ते पाच दिवसांची सुट्टी जाहीर झाली घरचे सगळे जण गावी गेले होते मग घरी एकटाच असल्याने काय करावं सुचत नव्हते मग सायकल वर अष्टविनायक दर्शन यात्रा करायचे ठरवले व सर्व नियोजन केले

दिवस पहिला :


बारामती शहर – मोरगाव – सुपा – कुसेगांव – पाटस – दौंड – सिद्धटेक – पुन्हा दौंड – पाटस – यवत – उरुळी कांचन – थेऊर फाटा ते थेऊर (187 कि.मी)
दिवाळीचा पाडवा झाल्यावर भाऊबीज दिवशी पहाटे अष्टविनायक दर्शन सोहळा पुर्ण करण्यास प्रारंभ केला पहाटे 5.30 मि कसबा येथील गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन अष्टविनायक दर्शन यात्रेतील पहिला मान असलेल्या मोरगाव च्या दिशेने वाटचाल केली व दिवाळी नंतर येणाऱ्या गुलाबी थंडीचे दिमाखदार स्वागत करत सायकल प्रवास चालु केला व क-हावागज – लोणी पाटी- तरडोली असा प्रवास करत पहिला गणपती मोरगाव येथे पोहचत मंदिरामध्ये प्रवेश केला आणि श्री मयुरेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले व मनामध्ये अष्टविनायक दर्शन सोहळा निर्विघ्नपणे पार पडु दे व पुर्ण होऊ दे असं साकडं घातलं आणि मंदिराच्या बाहेर पडलो आणि पेटपुजा केल्यानंतर मोरगाव चौकामधुन पुन्हा सायकल प्रवास चालु करत उगवलेल्या सुर्याची किरणे अंगावर घेत सुपा – कुसेगांव – पाटस मार्गे प्रवास करत दौंड शहरात प्रवेश केला व दौंड पासुन अवघ्या 16 कि.मी अंतरावर असलेल्या सिद्धटेकच्या दिशेने सायकल प्रवास चालु करत देऊळगाव राजा व शिरापुर मागं टाकत सिद्धटेक गणपती जवळ आल्यावर भीमा नदीचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळत अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धटेक गणपती येथे पोहोचलो व श्री सिध्दीविनायक गणपती चे मनोभावे दर्शन घेतले व थोडा वेळ आराम केला उसाच्या रसावर मनसोक्त ताव मारला व फ्रेश होऊन पुन्हा दौंड च्या दिशेने सायकल प्रवास चालु करत थेऊर कडे वाटचाल सुरु केली पाच च्या सुमारास दौंड मध्ये पोहचलो तेथे चहा पिऊन पाटस मार्गे यवत – उरुळी कांचन – थेऊर फाटा येथे मागं टाकत साधारण रात्री 9.45 च्या सुमारास यात्रेतील तिसरा गणपती थेऊर येथे पोहोचलो रात्री मंदिर बंद असल्याने दर्शन घेता आलं नाही आणि रहाण्यासाठी एक खाजगी रुम शोधली व जेवण करून पहिला मुक्काम केला.

दिवस दुसरा :
थेऊर – लोणीकंद – शिक्रापुर – कोंढापुरी – रांजणगाव गणपती – कवठे – पारगाव शिंगवे – नारायणगाव – ओझर – लेण्याद्री (123 कि.मी)
पहिल्या दिवशी खुप प्रवास झाल्यानंतर व आराम केल्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन सकाळी प्रथम थेऊर श्री चिंतामणी गणपती चे मनोभावे दर्शन घेऊन नतमस्तक होत दर्शन घेतले व चहाचा कप घेऊन थेऊर चा निरोप घेऊन सकाळच्या थंड वातावरणात पुन्हा एकदा सायकल प्रवास चालु करत चौथा गणपती रांजणगाव च्या दिशेने वाटचाल सुरु करत थेऊर – लोणीकंद – शिक्रापुर – सणसवाडी – कोंढापुरी असा प्रवास करत कधी रांजणगाव आलं कळल नाही व रांजणगाव येथे आगमन होताच भव्य दिव्य कमानीमधुन आत जाऊन सायकल पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत मंदिरात प्रवेश केला व सुट्टी असल्याने दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असल्याने रांगेत उभे राहुन दर्शन घेणं शक्य नव्हते शेवटी तेथील व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता आत मध्ये सोडुन माझी दर्शनाची व्यवस्था केली व त्यांचे आभार मानत मी रांजणगाव येथील महागणपती चे मनोभावे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन तेथील असलेल्या महाप्रसादाचा अस्वाद घेत स्वच्छ व सुंदर परिसर असलेल्या परिसरात फेरफटका मारला व तेथील असलेल्या अप्रतिम उद्यानात फोटो काढून मनसोक्त आराम केल्यावर दुपारनंतर कवठे – पारगाव शिंगवे असा सायकल प्रवास करत सायंकाळी सां 5.30 च्या सुमारास शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पोहोचलो व मसाला दुधाचा आनंद घेत नारायणगाव पासुन 12 कि.मी अंतरावर असलेल्या ओझरच्या दिशेने वाटचाल सुरु केली 6.15 च्या सुमारास यात्रेतील पाचवा गणपती ओझर येथे पोहोचलो व मंदिरात प्रवेश करताच सभा मंडपात आकर्षक विद्युत रोषणाईने स्वागत केले आत मध्ये जाऊन श्री विघ्नेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले व नतमस्तक होऊन मंदिरात थोडावेळ आराम केल्यानंतर तेथुन पुढे अवघ्या 15 कि.मी अंतरावर लेण्याद्री गणपती राहीला होता काय करावे सुचत नव्हतं पण जाऊ दे म्हणत कसाबसा लेण्याद्री येथे पोहोचलो व तेथील असलेल्या भक्तनिवास येथे यात्रेतील दुसरा मुक्काम केला.

तिसरा दिवस:
लेण्याद्री गणपती – गणेश खिंड घाट -माळशेज घाट – मोरोशी – टोकावडे – जय हनुमान हॉटेल – म्हसा – कळंब कर्जत – खोपोली – महड गणपती (143 कि.मी)
पहाटे लवकर उठुन फ्रेश होऊन त्यात सहाव्या गणपतीचे दर्शन होणार याचा आनंद तर होताच सकाळी लेण्याद्री मंदिरात जाण्यासाठी वर जाण्यासाठी प्रारंभ असताना वरती नजरेस पडणा-या आकर्षक लेण्या खुणावत होत्या व मध्येच माकडांचा वावर जास्त असल्याने माकड 🐒 इकडुन तिकडे उड्या मारत होती मध्यावर आल्यावर लेण्या स्पष्ट दिसत होत्या मंदिर जवळ आल्याने अगोदरच दर्शनसाठी रांग लागली होती रांगेत उभे राहुन दर्शन घ्यावे लागणार होते हे मंदिर लेण्यांमध्ये असुन देखील बाहेरुन आत पडणाऱ्या प्रकाशामुळे आतील बाप्पांची प्रसन्न मुद्रा अधिक स्पष्ट दिसत होती व रांगेत उभे राहुन लेण्याद्री श्री गिरिजात्मक गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन नतमस्तक झालो. तेथील असलेली लेणी व शेजारील असलेला स्तंभ प्रथमच पहात असल्याने मनसोक्त फोटो काढण्यासाठी मोह आवरत नव्हता व तेथे फेरफटका मारत अप्रतिम सौंदर्य न्याहाळत मनसोक्त फोटो काढत मंदिर परिसराचा निरोप घेऊन खाली उतरण्यास सुरुवात केली खाली आल्यावर पेटपुजा केल्यानंतर सायकल प्रवास चालु केला व माळशेज घाटातील अप्रतिम सौंदर्य पहाण्यासाठी मोर्चा वळवत असतानाच समोरच गणेशाच्या नावान असलेली खिंड म्हणजेच (गणेश खिंड) पार करायची होती या खिंडीत प्रवेश करताच क्षणभर विश्रांती या छोट्या टपरी वर चहा पिऊन गणेश खिंड चढण्यास सुरुवात केली ही खिंड प्रथमच चढत होतो त्यामुळे जास्त ताण नाही घेतला कशीबशी ही अवघड खिंड चढुन वर असलेल्या मंदिराचे दर्शन घेतले व थोडा आराम केला व नंतर सगळा उतार असल्याने चढ चढताना आलेला थकवा उतार लागल्यानंतर पुर्ण निघुन गेला व पुन्हा त्याच जोमाने सायकल प्रवास चालु केला नेहमीच माळशेज घाट पेपरमध्ये,नेटवर पहात होतो. या मार्गावर प्रवास करत असताना याचं आकर्षण तर होतच आणि त्यात सायकलवर असल्याने तेथील प्रत्येक जागाना जागा पहायला भेटणार याचाच आनंद जास्त होता
माळशेज घाट : माळशेज घाट म्हणजे महाराष्ट्रला निसर्ग सौंदर्य लाभलेल वरदान व प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे हा घाट कल्याण व नगर मार्गावर आहे या घाटात उंचीवरुन कोसळणारे धबधबे, कडे, कपा-या, हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा, निसर्ग रम्य दरी व रस्त्याच्या कडेला असलेल्या विश्रांती कक्ष आधिक लक्ष वेधुन घेतात येथुन पुढे जाण्यासाठी पाय निघत नव्हते या ठिकाणी आल्यावर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगेसमोर नतमस्तक होऊन या निसर्ग सौंदर्याला नमस्कार केला व मनसोक्त फोटो काढले व घाटाच्या मध्यावर येताच कपारीत असलेल्या भोलेनाथाचे दर्शन घेतले व भ उकडलेल्या कणीसावर मनसोक्त ताव मारत माळशेज घाट उतरण्यास प्रारंभ करत केला पण प्रथमच एवढा मोठा उतार उतारला‌ नव्हता आणि तो काही संपता संपत नव्हता अक्षरशः हा उतार कधी संपणार असं वाटतं होता हा परिसर वनविभाग असल्याने भयानक शांतता आणि मी व माझी सायकल एकटाच असल्याने जरा मनात रुखरुख.अखेर मोरोशी या गावापासुन जय हनुमान हॉटेल आल्यावर या घाटाचा समारोप होतो अशाप्रकारे या घाटाचा निरोप घेऊन म्हसा – कळंब – कर्जत – खोपोली असा प्रवास करत रात्री 9 च्या सुमारास यात्रेतील सातवा गणपती महड येथे पोहोचलो व येथे जेवण करून तिसरा मुक्काम करत झोपी गेलो.

दिवस चौथा :
महड – पाली – महड – खोपोली – लोणावळा – वडगाव – पिंपरी चिंचवड – पुणे (163 कि.मी )
महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याचा निरोप घेऊन अष्टविनायक दर्शन यात्रेतील सायकल प्रवास अंतिम टप्प्यात असल्याने अखेरचा प्रवास लवकर पुर्ण करायच्या हेतुने सकाळी लवकर उठुन सातवा गणपती महड येथील वरद विनायक गणपतीचं मनोभावे दर्शन घेतले व सकाळची न्याहारी करत महड पासुन 35 कि.मी अंतरावर असलेल्या पाली गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सायकल प्रवास चालु करत साधारण अकराच्या सुमारास यात्रेतील आठवा गणपती पाली येथे पोहोचलो व शेवटचा गणपती असल्याने आनंद तर ओसंडुन वाहत तर होताच त्यापेक्षा या दिवशी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण अष्टविनायक दर्शन अखेर पुर्ण होणार होत याचाच आनंद जास्त होता अखेर श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले व मंदिरात असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराबाहेर आल्यानंतर समोरच‌ नजरेसमोर असलेल्या सुधागडचे दर्शन घेऊन त्याला‌ लांबुनच मुजरा केला आणि मंदिराच्या बाहेर पडलो आणि पुन्हा महड- खोपोली – लोणावळा – वडगाव मावळ – पिंपरी चिंचवड असा सायकल प्रवास करत पुणे येथे रात्री आठच्या सुमारास पोहोचलो व यात्रेतील चौथा मुक्काम केला

अष्टविनायक दर्शन पुर्ण केल्याबद्दल श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती येथे आरती करण्याचा मान मिळाला व सत्कार करण्यात आला व श्री कसबा गणपती व श्री तुळशीबाग गणपती येथे सत्कार करण्यात आला.

पाचवा दिवस :
पुणे – सासवड – जेजुरी – मोरगाव – बारामती शहर (105 कि.मी)
पुण्याहुन सकाळी नऊ वाजता सायकल प्रवास सुरु करत दिवे घाट – सासवड – जेजुरी – मोरगाव येथे सायंकाळी सहाच्या सुमारास पोहोचत मोरगाव येथील श्री मयुरेश्वराचे मंगलमय वातावरणात मनोभावे दर्शन घेतले व माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे अष्टविनायक दर्शन पुर्ण करत मोरगाव येथे समारोप केला व बारामती नगरी मध्ये रात्री 8 च्या सुमारास पोहोचलो.

या यात्रेदरम्यान फोटो काढणारे सर्व व काही ना काही मदत करणा-या मान्यवरांचे देखील मनापासुन विशेष आभार मानून त्यांनी शेवटी..जयघोष करीत

                  ॥ बोला गणपती बाप्पा मोरया॥....
Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on