बारामतीच्या सर्वांगीण राजकीय पंढरीला खिंडार पाढण्याचा प्रचंडमोठया प्रमाणावर प्रयत्न ….!

0
93

संतोष शिंदे संपादक भावनगरी बारामती ९८२२७३०१०८

बारामतीच्या सर्वांगीण राजकीय पंढरीला खिंडार पाढण्याचा प्रचंडमोठया प्रमाणावर प्रयत्न ….!

शरद पवार आणि बारामती हे गेल्या पाच दशकाहून अधिक काळ राजकीय डावपेच असलेली राजकीय पंढरी म्हणून देशात ओळख आहे.

याच बारामतीत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करत काहीही झाले तरी बारामतीची जागा जिंकायचीच असा जणू चंग बांधलेला दिसून येतो आहे.
यासाठी प्रयत्न जोरात सुरु असून यावेळी बारामतीच्या शाबुत गडाला खिंडार पाडायचा असा कट दिल्लीत शिजलेला आहे…!

कोण म्हणतं विकास,कोणी भावनिक ,तर कोणा एकाच्या अस्थित्वाच्या प्रश्न, या लोकसभा२०२४ बारामती निवडणुकीत दोन राष्ट्रवादी पक्ष यांच्यात सामना चुरशीचा होणार असल्याने तर सामना पाहणारे,लावणारे पराकष्ठा घेत सर्वस्वाचा त्याग केला जातो आहे. बारामती लोकसभा निवडणूक आगळ्यावेगळ्या धोरणात्मक विंचारणात्मक निर्णयावर येऊन ठेपलेली आहे.
कोणा एकाच्या अस्थितवाच्या प्रश्नावर चर्चा होत आहे.

बारामतीचा आजवर
“पवार गड ‘ शाबुत ठेवलेला आहे,”तो येथील जागृत मतदार जनतेने देशात कोठे काहीही निर्णय व्होवो,बारामती तालुक्यात बारामती येथील जनता जनार्दन मात्र पवार निर्णयावर ठाम होती…!”

यावेळी परिस्थिती तशी वेगळी आहे.राजकीय डावपेच फासे,बरोबर पडलेली आहेत आशयाची चर्चा आहे. सर्वपक्ष एकवटले असून ज्येष्ठांचा पराभव करायचाय कारण," त्या अतृप्त आत्म्याने म्हणे महाराष्ट्र अस्थीर केला आहे.

असे शरद पवार यांचे नाव न घेता पुण्यातील त्या सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

यावरून लक्षात येईल की पवार नावाची दाहकता दिल्लीत ,राजकीय पटलावर तप्तलाव्हारसामुळे चटके बसत असावे ,तेव्हा त्याचा प्रत्य आजही बारामतीत महायुतीच्या प्रचारतून येतो.

यावेळी बारामती लोकसभा निवडणुक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. बारामतीची राजकीय लढाई आता कडवट वळणावर वळत आहे.कारण एकीकडे सुनेत्रा पवार बारामतीची सून तर अर्थात विकास कामांना प्राधान्य देतात,दुसरीकडे तीन टर्म बारामतीची खासदार लेक ज्येष्ठ नेते,तथा उद्याचे भविष्य,पवारांची देशाच्या राजकारणातील राजकीय दबावतंत्र इज्जत, गमवायची की सुनेला विजयी करायचे… आजमितीस जिंकला तरी आपलाच पराभव झाला तरी आपलाच असे ऐकवले जाते प्रत्यक्षात तसे नसून हरले तर ज्येष्ठ पवार यांचा बारामतीच्या लेकीच्या माध्यमातून पराभव तर बारामतीची सून जिंकले तर भाजपा नरेंद्र मोदी विजय असाच सामना चुरशीचाच होणार आहे…! येणाऱ्या सात तारखेला निर्णय तसा अवघड आहे मतदार जनता याकडे कसे पाहते हे पाहणे आवश्यक……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here