बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील नवा अध्याय….!
बारामतीचा क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली वारसा अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत (नाना) सातव यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा निर्णय बारामतीच्या क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे.
नाना सातव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले आहेत. कारभार (अण्णा) चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून के.पी.एल यासारखे त्यांनी अनेक उपक्रम राबवले, राबवत आहेत, ज्याचा थेट फायदा गरजू खेळाडूंना, विद्यार्थ्यांना,नागरिकांना झाला आहे. आता त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान देण्याची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे बारामतीतील क्रिकेटप्रेमींना उत्तम दर्जाचे मैदान आणि सुविधा मिळणार आहेत. स्थानिक खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे केवळ एक मैदानी सुविधा नसून, बारामतीच्या तरुण खेळाडूंसाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे. येथे दर्जेदार प्रशिक्षक, उत्तम सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन केल्यास, बारामतीतील क्रिकेटपटू भविष्यात मोठ्या स्तरावर चमकू शकतात. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बारामतीच्या खेळाडूंचे नाव गाजावे, यासाठी नाना सातव यांनी कंबर कसली आहे.
25 फेब्रुवारी 2025 पासून ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. बारामतीच्या क्रीडा विश्वासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या नव्या पर्वाच्या निमित्ताने, नाना सातव आणि त्यांच्या कार्यसंघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
साप्ताहिक भावनगरीचे 2013 चे भाकीत खरे ठरले…!
अखेर कारभारी (आण्णा) चॅरिटेबल फाउंडेशन कडे जबाबदारी दिलीच….!
- संपादकीय ….संतोष शिंदे…
