बारामतीचा विजय…दिल्लीकरांना पवाराची दहाक्ततां….!?

0
119

भावनगरी संपादक संतोष शिंदे बारामती…..9822730108

…….. .. मै समुद्रोका का मिजाज हुं
मुझे उस नदी का पता नही सभी आकर मुझसे निपट गये मै किसी से जाकर मिला नही…!

पवार आणि बारामती हे गेल्या पाच दशकाहून अधिक काळ राजकीय डावपेच असलेली राजकीय पंढरी म्हणून देशात ओळख आहे.

बारामतीत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करत काहीही झाले तरी बारामतीची जागा जिंकायचीच असा जणू चंग बांधलेला दिसून आले
यासाठी तसे जोरात प्रयत्न झाले होते..परंतु पवार गड काही त्यांना सर करता आला नाही…

बारामतीच्या शाबुत गडाला खिंडार पाडायचा कट दिल्लीत शिजलेला गेला होता,असे म्हंटले जात होते..!

कोण म्हणतं होते,विकास कोणी भावनिक ,तर त्यांच्या अस्थित्वाच्या प्रश्न उभा ठाकला होता,
आणि या लोकसभा२०२४ बारामती निवडणुकीत दोन राष्ट्रवादी पक्ष यांच्यात सामना चुरशीचा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

तर …सामना पाहणारे,लावणारे पराकष्ठा घेत,..बारामतीची लोकसभा निवडणूक आगळ्यावेगळ्या धोरणात्मक विंचारणात्मक निर्णयावर येऊन ठेपलेली होती.

विरोधकांकडून पवार साहेबांना घरी बसवायचे असा जणू काही चंग बांधलेला होता.

काही नेत्यांचे व देशाच्या पंतप्रधानाचे ते वक्तव्य लोकांना भावनिक करून गेले.

सर्व प्रयत्न झाले आणि शेवटी शेवटी तानाशाहीच्या बोलण्याने घनाघात झाला. असेही येथील जनतेतून बोलले जाऊ लागलेले आहे.

कोणा एकाच्या अस्थितवाच्या प्रश्नावर चर्चा होत होती. यामुळेच येथील मतदार जनतेनेच ही निवडणूक आपल्या हाती घेतल्याचे चित्र दिसून आले.

बारामतीचा
“पवार गड ‘ शाबुत ठेवलेला आहे,”तो येथील जागृत मतदार जनतेने देशात कोठे काहीही निर्णय व्होवो,बारामती तालुक्यात बारामती येथील जनता जनार्दन मात्र पवार साहेबांच्या मागे ठाम उभी होती…!”हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

यावेळी परिस्थिती तशी वेगळी होती.राजकीय डावपेच फासे,बरोबर पडलेत आशयाची चर्चा होती.

सर्वपक्ष एकवटले होते ते ज्येष्ठांचा पराभव करायचाच असे बोलले गेले तर,” त्या अतृप्त आत्म्याने म्हणे महाराष्ट्र अस्थीर केला आहे.
असे शरद पवार यांचे नाव न घेता पुण्यातील त्या सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

यावरून लक्षात येईल की पवार नावाची दाहकता दिल्लीत ,राजकीय पटलावर तप्तलाव्हारसामुळे चटके बसत असावे ,तेव्हा त्याचा प्रत्य काल आला .

बारामती लोकसभा निवडणुक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली होती. बारामतीची राजकीय लढाई कडवट वळणार काय अशी चर्चा होती. कारण एकीकडे सुनेत्रा पवार बारामतीची सून तर अर्थात विकास कामांना प्राधान्य देतात,दुसरीकडे तीन टर्म बारामतीची खासदार लेक ज्येष्ठ नेते,तथा उद्याचे भविष्य,पवारांची देशाच्या राजकारणातील राजकीय दबावतंत्र इज्जत, गमवायची की सुनेला विजयी करायचे…मितीस जिंकला तरी आपलाच पराभव झाला तरी आपलाच असे ऐकवले जात असे. प्रत्यक्षात तसे नसून हरले तर ज्येष्ठ पवार यांचा बारामतीच्या लेकीच्या माध्यमातून पराभव तर बारामतीची सून जिंकले तर भाजपा नरेंद्र मोदी विजय असाच सामना चुरशीचाच होता …! मतदान सात मे 2024 तारखेला झाले निर्णय तसा अवघड होता मतदार जनतायाकडे कसे पाहते हे पाहणे आवश्यक……होते.


मात्र बारामतीचा विजय पवार साहेबांच्या माध्मातून जनतेचा विजय झाला . कारण की ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती .
हेच या निकालावरून दिसून आले. शेवटी साहेबांच्या बाबतीत निकालावरून सांगायचे म्हटले तर ….. यही सच है की…

मुझे क्या मिटायेगी गर्दिश जमाने की मेरी तो आदत है गमे भी मुस्कुराने की…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here