बायफ संशोधन संस्थेत विद्या प्रतिष्ठानच्या सहा विद्यार्थ्य्याना संधी

0
103

बायफ संशोधन संस्थेत विद्या प्रतिष्ठानच्या सहा विद्यार्थ्य्याना संधी

विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर प्रथम वर्ष संगणक शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना नोकरी प्रशिक्षण पध्दत (ऑन जॉब ट्रेनिंग) या उपक्रमासाठी मुलाखती घेतल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बायफ संस्थेचे इंजिनीयर युवराज गोंडारे, तेजश्री शिरसाठ व निखिल पुंडे हे मान्यवर मुलाखती घेण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी यांनी प्रास्ताविक केले तर पदव्युत्तर समन्वयक डॉ. जगदीश सांगवीकर पाहुण्यांचा परिचय करून दिला व सत्कार केला.

युवराज गोंडारे व निखिल पुंडे यांनी प्रथम बायफ संस्थेची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या रीतसर मुलाखती घेतल्या. यातून विभागातील सहा विद्यार्थ्यांची निवड केली या विद्यार्थ्यांना तीन महिन्याचे निशुल्क नोकरी प्रशिक्षण पध्दतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये आपले शोध निबंध प्रकाशित करण्याची संधी मिळणार आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, नीलिमा पेंढारकर,
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अँड अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, डॉ राजीव शहा, किरण गुजर, मंदार, सिकची, कर्नल श्रीष कंबोज यांनी हार्दिक अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक शास्त्र विभागातील गौतम कुदळे, तृप्ती कदम, प्रियंका साळुंखे, सोनाली ढवळे, रमा रोडे, क्रांती सपकळ, सारिका खेत्रे, कल्पना भोसले, श्रद्धा ननवरे मोनिका जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here