फ्रेश फूड मार्ट या ड्रायफ्रूट शॉपला अजितदादांची सदिच्छा भेट
बारामतीतील नामांकित सूत्रसंचालक श्री. ज्ञानेश्वर जगताप यांनी कॅनॉल रोड येथे फ्रेश फूड मार्टची दुसरी शाखा दसऱ्याच्या दिवशी सुरू केली आहे ज्याचे उद्घाटन सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. या ड्रायफ्रूट शॉपला सदिच्छा भेट दिली.
यावेळी या शॉपमधील प्रत्येक गोष्टीची बारकाव्याने माहिती घेत कोणते ड्रायफ्रूट कोठून येते, कोणत्या ड्रायफ्रूटचा काय फायदा आहे तर कोणत्या ड्रायफ्रूटला जास्त मागणी आहे या सर्व गोष्टींची माहिती घेतली. शिवाय भटिंडा पंजाबवरून येणाऱ्या गूळ गजक चिक्कीचा आस्वाद घेऊन त्याचे मनभरून कौतुकही केले.
कोविड काळात समोर उभी राहिलेली संकटे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या जगताप परिवाराने 3 वर्षात दुसरी शाखा निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले,महत्वपूर्ण सल्लाही दिला आणि भविष्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या.