बारामती प्रचंड उत्साहाने श्रीरामाच्या जयघोष दुमदुमली…!
बारामती : प्रतिनिधी :-
बारामती प्रचंड उत्साहाने श्रीरामाच्या जयघोष श्रीराम जय राम जय जय राम…
जय श्रीराम …जय श्रीराम.. जय श्रीराम…. अवघी बारामती… ठिकठिकाणी पुजापाठ, आरत्या व नामघोष मोठ्या उत्साहात अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बारामतीतही रमल्लाचा राम नामाच्या चैतन्यपूर्ण सोहळा पार पडला
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज बारामतीतील वातावरण राममय झालेले होते. शहरात अनेक इमारतींसह लोकांनी घरावर विद्युत रोषणाई केली होती, अनेकांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. काहींनी घरावर गुढी उभारली होती. बारामतीतील ऐतिहासिक देवळे यांच्या श्रीराम मंदीरात बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी योजना देवळे, नेहा देवळे, पूजा देवळे, किशोर देवळे, मकरंद देवळे, ओंकार देवळे उपस्थित होते.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदीरात महिलांनी सुंदरकांड वाचन केले. त्या नंतर श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. हनुमाच चालिसा पठण व श्रीरामांची आरती केली गेली. मंदीरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती, मंदीरावर रोषणाई केली गेली. रामनामाच्या जपाने मंदीराचा परिसर दुमदुमला होता. शहरात असंख्य ठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत होते. शहरातील घरांसह, संस्था व जागोजागी भगवे झेंडे लावलेले होते. अनेक ठिकाणी भव्य फलक लावलेले होते. शहरातील महत्वाच्या चौकात कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेक मंडळे व कार्यकर्त्यांनी लाडू व पेढ्यांचेही वाटप केले. काही ठिकाणी दुकानदारांनी अय़ोध्येतील सोहळ्याचे प्रक्षेपण टीव्हीवर दाखविण्याची सोय केली होती.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज बारामतीतील वातावरण राममय झालेले होते. शहरात अनेक इमारतींसह लोकांनी घरावर विद्युत रोषणाई केली होती, अनेकांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. आगळ्यावेगळ्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा भारत उत्सुक असताना बारामती मग कुठे मागे राहणार…
शहरातील सर्वच मंदीराची स्वच्छता करुन रोषणाई करण्यात आली होती. सर्वच मंदीरांवर अत्यंत आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. शहरातील बहुसंख्य कापड दुकानदारांनी आपापल्या दुकानातून भगवी थीम करत भगव्या रंगांचे कपडे दर्शनी भागात लावलेले होते. सम्यक दुकानातील सर्व कर्मचा-यांनी आज भगव्या रंगांचे कपडे व डोक्यावर टोप्या परिधान करुन जय श्रीरामाचा जयघोष केला. या प्रसंगी बारामती तालुक्यात शहरात ठिकठिकाणी रामनामा स्वर गुंजन ऐकावयास मिळाले.