पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालकपदी रणजित अशोकराव तावरे…
प्रतिनीधी :-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर बारामती तालुक्यातून ‘अ’ वर्ग मतदार संघामधून रणजित अशोकराव तावरे रा.माळेगाव बु. ता.बारामती यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदी अजितदादा पवार यांचे सूचनेवरून आज बुधवार दि.08/11/2023 रोजी जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विद्यमान चेअरमन दिगंबर दुर्गाडे सर यांनी नांव सुचवले… तसेच सूचक म्हणून दत्तात्रयमामा भरणे तर यांस अनुमोदन रमेश आप्पा थोरात यांनी दिले व बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले .
उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी पीडीसीसी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर रणजित तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी रणजित तावरे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रदीप गारटकर
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्ह्य, संभाजीनाना होळकर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तर इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्य रणजित तावरे यांचे अभिनंदन केले.