पारधी समाजाची मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेऊन ओम महिला मंडळाने समाजा पुढे ठेवला आदर्श- सुनिता धनराज काळे.

0
15

पारधी समाजाची मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेऊन ओम महिला मंडळाने समाजा पुढे ठेवला आदर्श- सुनिता धनराज काळे.

पारधी समाजाची मुलगी सोनल काळे हिस या वर्षी ओम महिला मंडळाने संक्रांत निमित्त दत्तक घेतले.सदर कार्यक्रम प्रसंगी मुलीच्या आईने सुनिता काळे हिने मनोगत व्यक्त केले.ओम महिला मंडळानं मला सोबत बरोबरीनं बसवून समाजाला एक मोठा विचार दिला. म्हणून म़ंडळातील सर्व पदाधिकारी महिलांचे व संस्थापक अध्यक्षा साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव यांचे मी मनापासून आभार मानते.असे मत मुलीची आई सुनिता धनराज काळे (पोलीस पाटील वरकटणे )हिने मांडले.

पुढे ती म्हणाली की आमच्या समाजात मुलींना जास्त शिकवत नाहीत.मी कसेतरी डीएड पूर्ण केले.पण नौकरी नाही.
माझ्या मुलीला शिकवायचे तर तेवढी परिस्थिती नाही.पण एकदा पोलीस स्टेशन च्या कार्यक्रमात अंजली मैम मला भेटल्या म्हणाल्या की मुलीला शिकव.काही गरज वाटली अडचण आली तर भेट आणि
आज अंजली राठोड श्रीवास्तव व बाकी महिलांनी माझ्या मुलीस १०वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन ही आगळीवेगळी संक्रांत साजरी करुन समाजाला एक नवी दिशा दिली.
शासनाच्या काही शैक्षणिक योजना असतात त्या ही पूर्णतः आमच्या पर्यंत पोहचत नाही.
अशी ही खंत तिने व्यक्त केली.

प्रास्ताविकात अंजली राठोड श्रीवास्तव म्हणाल्या की माझ्या म़ंडळातील महिला वैचारिक दृष्ट्या एक पाऊल पुढेच आहेत.म्हणून इतकं श्रीमंती कार्य नेटकेपणानं पार पडतं.ज्ञानमाता साऊ,राष्ट्रमाता जिजाऊ,त्याग मूर्ती रमाई जयंती निमित्त तसेच संक्रांत सणाचे औचित्य साधून आम्ही दरवर्षी शिक्षणासाठी एक मुलगी दत्तक घेतो.आज पर्यंत २६ मुली दतक घेऊन झाल्या आहेत.
पारधी समाजाकडं समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.त्यांना आपणहून संधी दिली पाहिजे.
अशा दुर्लक्षित समाजातील मुलींना शिक्षणासाठी आपण तयार करावं काही मदत करावी.म्हणून आज ओम महिला मंडळानं सोनल काळे इ ४थी हिस शिक्षणासाठी दत्तक घेतले.
असे मत अंजली श्रीवास्तव यांनी मांडले.
रेशमा जाधव, मितवा श्रीवास्तव अग्रवाल, सरोजिनी कांबळे, सुनिता यादव, बालिका यादव यांनी स्वागत गीत सादर केले.
उषा बलदोटा,पुष्पा लुंकड शहनाज मोमीन,अलका यादव ,डॉ कविता कांबळे यांनी ही आपले विचार प्रस्तुत केले.
जयश्री वीर यांनी सूत्रसंचालन केले . तसेच
मंजू राठोड,नगमा मोमीन, रुपाली मिसाळ, मितवा श्रीवास्तव अग्रवाल, सरोजिनी कांबळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले.
आभार ज्योतीताई पांढरे यांनी मांडले.
या कार्यक्रमासाठी मा.तेजस्वी सातपुते मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. करमाळ्यातील ओम महिला मंडळ हे
शिक्षणापासून वंचित राहणा-या मुलींना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते.
त्यांच्या या कार्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मा.तेजस्वी सातपुते.(डीसीपी ) (डिप्युटी कमिशनर ऑफ पुलीस मुंबई) तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पत्रकार बंधूंनी ही कार्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here