पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी बारामतीत शाडूच्या गणेशमूर्तींचा विशेष उपक्रम
बारामती : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बारामती आणि द बारामती मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीचा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ‘ना नफा – ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यावरणाचे संवर्धन करत गणरायाची भक्तिभावाने स्थापना करता येणार आहे.
मूर्ती मिळण्याचे ठिकाण : सुभाष चौक, बारामती
नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“गणरायाची भक्तीही जपूया आणि पर्यावरणाची जबाबदारीही निभावूया!”




