पत्रकार महेमुद खान सर यांना प्रभावती नगरी गौरव उत्कृष्ट पत्रकारिता सेवा रत्न पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले वीर वारकरी सेवा संघ राष्ट्र जन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र राज जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हा प्रभावती नगरी गौरव पुरस्कार परभणीतील लोकप्रिय समाजसेवक तथा पत्रकार चळवळीत काम करणारे महेमूद खान सर यांना उत्कृष्ट पत्रकारिता सेवा रत्न पुरस्कार सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील, स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे प्रमुख पाहुणे युगंधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव आढागळे, रूक्मीनबाई जाधव बालकलाकार रुद्राक्ष आवटे, कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने 12 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता संकट मोचन हनुमान मंदिर सभागृह वसमत रोड परभणी येथे सन्मानित करण्यात आलं अशी माहिती लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली