पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २२ मार्च रोजी….

0
34

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २२ मार्च रोजी

पुणे, दि. २०: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, नऱ्हे धायरी मार्ग, पारी चौक, धायरी, पुणे येथे‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०- २६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे सहायक संचालक सागर मोहिते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here