निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा…!

0
59

बारामती, प्रतिनिधी- निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत प्रदीप गारटकर, वासुदेव काळे व किरण गुजर या तिघांचा समावेश असून ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असेल. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हा मुळशी मध्ये कुलदीप कोंडे , यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here