नाशिक जिल्ह्यातनाभिक समाजातील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणाचा : तीव्र निषेध
बारामतीत सर्व सलून दुकाने बंद; नाभिक समाजाचे प्रशासनाला निवेदन
बारामती | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील खमगाव तालुक्यातील बलालगाव येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात आज बारामती शहर व तालुक्यात नाभिक समाजाकडून तीव्र जाहीर निषेध नोंदवण्यात आला. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत सर्व सलून दुकाने बारामती व तालुक्यात बंद ठेवून सर्व नाभिक समाज बांधवांनी एकजूट दाखवली.
या आंदोलनाअंतर्गत बारामती तालुका नाभिक संघटना, बारामती तालुका नाभिक महामंडळ तसेच शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या वतीने बारामतीचे प्रांताधिकारी, तहसीलदार व बारामती शहर पोलीस स्टेशन येथे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.यावेळी बहुजन समाजवादी पार्टीचे काळूराम चौधरी यांनीही आपला पाठिंबा दर्शविला
निवेदनात आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, सदर खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला तातडीचे पोलीस संरक्षण द्यावे, अशा ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी बारामती तालुका नाभिक संघटनेचे आणि बारामती तालुका नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निष्पाप अल्पवयीन मुलीवर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत नाभिक समाजाचा लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला




