नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय पाटील यांचा मातंग समाजाच्या वतीने सत्कार

1
600
नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय पाटील यांचा मातंग समाजाच्या वतीने सत्कार

नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय पाटील यांचा मातंग समाजाच्या वतीने सत्कार

बारामती : बारामती शहरातील सर्वच घटकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष जय दादा पाटील यांनी केले.

बारामती शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मामा खंडाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी येथे समाजाच्या वतीने जय पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

गेली पन्नास वर्षांपासून बारामती शहर व तालुक्यातील मातंग समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ काम करत आहे. ग्रामपंचायत,जिल्हा परिषद,नगरपालिका,विधानसभा, लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये मातंग समाज नेहमीच एकनिष्ठ राहून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करत आला आहे. असे सांगून आजही मोठ्या संख्येने पुरुषांबरोबर महिलाही पक्षात काम करत आहेत. त्यांनाही पक्षाने विविध जबाबदाऱ्या द्याव्यात. तसेच बारामती शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. ही मागणी येणाऱ्या एक ऑगस्ट पूर्वी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा चंद्रकांत खंडाळे,गजानन गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी प्रा.प्रभाकर घेरे,टी.व्ही.मोरे,सचिन सकट, उमेश गायकवाड,बापू खंडाळे,कैलास शिंदे,राजू मदारी,नरेंद्र भिसे, राजू खंडाळे,विशाल खंडाळे यांच्यासह पारवडी,लिमटेक, गुणवडी,गोजूबावी,माळेगाव,काऱ्हाटी,मेखळी,कटफळ, सोनगाव आदी ठिकाणचे समाज बांधव उपस्थित होते.


शहरातील नागरिकांसाठी विशेषतः तरुण-तरुणींसाठी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच रुग्णांसाठी वैद्यकीय मदत कक्ष सुरू करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितल

Next articleबारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाला रू.९०००/- दर
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here