देशात …महाराष्ट्राचे राजकारण एक वेगळ्या राजकीय ॲक्शन मोडवर….! ?

0
139

देशात …महाराष्ट्राचे राजकारण एक वेगळ्या राजकीय ॲक्शन मोडवर….!?

संपादक संतोष शिंदे भावनगरी 98 22 73 0 1 08 बारामती

राजकीय पटलावर सध्या स्थित महाराष्ट्रात चाललंय तरी काय … सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न…
महाराष्ट्र राज्याची संस्कृती काय..येथील मातीतील संत महात्म्यांचे चारित्र्य विद्वान बोध विचार आचार विचार आचरण , मनुष्य जन्मात प्रत्येकाने प्रत्येकाशी कसे वागावे कसे बोलावे कसे राहावे , या महाराष्ट्र भूमीच्या रक्षणाकरिता या मातीत पदस्पर्श झालेल्या छत्रपती शिवरायांचे राजाचे संस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, महात्मा फुलेंची शिकवण शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा …

वरील सर्व वाक्य वाचल्यावर आजच्या घडीला सर्वकाही व्यर्थ असेच उत्तर मिळेल.

देशाचे राजकारण सत्ता कारण वरिष्ठ पातळीवर निर्णय हे जितके सहजतेने घेतले जातात ते अमलात आणले जातात परंतु त्यासाठी जी किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागत आहे ते मात्र दुर्दैवी आहे.
यावरून एक लक्षात येते की राजकीय पटलावर जे काही आज महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र विचित्र जो राजकीय चित्रपट पाहिला मिळत आहे. राजकीय बदलते समीकरणे घराणेशाही सत्ता वर्चस्व वर्चस्वासाठी लढाई स्वायत्तता हुकुमशाही पद्धतीचे राजकारण महाराष्ट्र राज्याच्या मातीसाठी नक्कीच वेगळ आहे .

ओरिजनल दाखवल्या जात नाही सर्व काही वरचे राजकारण राजकीय राजकारणी करत आहेत.

कोणीही कुठल्याही पक्षात असो मात्र तो आपल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचा मात्र वाटत नाही.
दररोज आपापल्या सोयीनुसार पक्षहिताच्या वेळेनुसार चाललेले पक्षांतर करून संभ्रम निर्माण का करतात राजकारणी.. भोळ्याभाबड्या मतदारांना ओळखणे आता कठीण होऊन बसले आहे. याचाच अर्थ लोकशाही धोक्यात आहे…?!

भारत देशात राजकीय गणित वेगवेगळ्या पटलावर जात असताना… त्यात आता महाराष्ट्र राज्य ही आपली राजकीय कुस बदलताना दिसत आहे…!

महाराष्ट्रातील काही राजकीय बड्यामंडळींना सत्तेची लालच भूक काही गप्प बसू देत नाही म्हणून या राजकीय राजकारण्यांनी गेल्या काही वर्षापासून आपली व आपल्याची व आपल्यांची राजकीय पोळी भाजण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे आपले त्याचे हित जोपासणे हेच यांचे कर्तव्य यातून स्पष्ट दिसू लागलेले आहे… सर्वसामान्य जनतेचे यांना काहीही देणे घेणे दिसून येत नाही… सर्व सामान्य जनता मात्र उपाशी हे मात्र तुपाशी !

सध्या स्थिती भारत देशाचा कारभार एकहाती कुठल्यातरी एकाराजकीय दबावाला बळी पडून एखादी विलक्षण पावर सत्ता आणण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे त्यामुळे उद्याचे लोकशाही भवितव्य कशावर अवलंबून आहे हेच सर्वसामान्यांना संभ्रमात टाकणारे आहे .

यावरून देशातील मतदार जनतेची विश्वासहर्ता राजकीय मंडळी हिरावून घेत मतदार राजाला उल्लू बनवण्याचे वाटते आहे….!

राजकारणी राजकीय मंडळींना राजकीय पक्ष काढणे पक्षांतर करणे सोपे होऊन गेलेले आहे करिता

आज या पक्षात उद्या त्या पक्षात उद्या स्व पक्ष ही जी काही महाराष्ट्रात वस्तुस्थिती राजकीय पक्षाची सुरू आहे. त्यावरून राजकीय गणित महाराष्ट्राचे चुकत असल्याचे दिसून येत आहे यावरून महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याचेही जाणवू लागलेले आहे… महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय विकास कोणाचा सर्वसामान्यांचा की त्या मूठभर धानिकांचा या वरील कारणातून विकास कोणाचा हे स्पष्ट होते .

प्रश्न निर्माण होत आहे.. सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करायला ही मंडळी तयार झाली… असे चित्र निर्माण झाले आहे….!

आज देशात विकास झाला तो कशामुळे कोणामुळे याचा भार कोणाला सोसावा लागत आहे . त्याच्या झळा सर्वसामान्य जनतेलाच भोगावे लागत असतात.

कारण सर्वसामान्य जनतेच्या खिशातून ती कररूपी पैसा गेलेला असतो

हा विकास केला झाल्याचे कोण बजावून सांगतो आहे त्तांच्या काही खिशातून केलेला आहे का त्यानी तो विकास.. हे अगोदर स्पष्ट करावे..
जनतेच घ्यायचेना जनतेलाच द्यायचे असेच सत्ताधारी करताहेत . त्यांना निवडून त्यासाठीच मतदारांनी दिलेले असते… मतदारांनी निवडून दिलेल्या मताच्याद्वारे मिळवलेल्या सत्तेतून ही केलेली सेवा निस्वार्थी कुठलेही अपेक्षा न ठेवता राजकारण्यांनी मानव सेवा ही ईश्वर सेवा पहिली… समजावी . तरच खऱ्या अर्थाने लोकशाही जीवित राहून सत्ताधाऱ्यावर विश्वास राहिलं ….?!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here