देशातील महाविजयाची ऐतिहासिक नोंद! बारामतीत विक्रमी मताधिक्याचा गजर….!

0
14

महाविजयाची ऐतिहासिक नोंद! बारामतीत विक्रमी मताधिक्याचा गजर….!

बारामती मतदारसंघाने आज राज्याच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा विक्रम घडवला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड मताधिक्याने सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दणदणीत विजय संपादन करत जनतेचा अभूतपूर्व विश्वास मिळवला आहे. हा विजय केवळ राजकीय यश नसून बारामतीकरांच्या एकजुटीचा आणि भावनिक नात्याचा परिपाक मानला जात आहे.

आधीचे विक्रम मोडीत
भारतभरातील मोठ्या मताधिक्यांच्या नोंदी पाहता—
सुनील कुमार शर्मा (साहिबाबाद, 2022) – २,१४,८३५
पंकज सिंह (नोएडा, 2022) – १,८१,५१३
अजित पवार (बारामती, २०१९) – १,६५,२६५
काशीराम पावरा (शिरपूर, २०२४) – १,४५,१४४
या सर्व विक्रमांना मागे टाकत बारामतीतील सध्याचा विजय नवीन इतिहास रचणारा ठरला आहे.

भावनिक पार्श्वभूमी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या२०२६ पोटनिवडणुकीत जनतेने भावना, निष्ठा आणि विकासाची परंपरा यांना कौल दिला. असे मत विजयी उमेदवार बारामतीच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती सुनेत्रा अजित दादा पवार यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात व्यक्त होत असलेल्या अंदाजांना खरे ठरवत हा विजय साकारला गेला.

जनतेचा विश्वास ठाम
बारामतीकरांनी दाखवलेली साथ ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, ती विश्वास, प्रेम आणि नेतृत्वावरच्या श्रद्धेची साक्ष देणारी आहे. विकासाची वाटचाल, स्थानिकांशी असलेले नाते आणि नेतृत्वाची परंपरा यांचा ठसा या निकालात स्पष्टपणे उमटला आहे.

इतिहासात नोंद होणारच
हा विजय केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून, तो एक राजकीय मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. बारामतीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, योग्य नेतृत्वावर विश्वास ठेवला तर जनतेची ताकद विक्रम घडवू शकते.
बारामतीचा हा महाविजय आता संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here