दि. माळेगाव स.सा.का.लि.तर्फे सभासदांसाठी आरोग्य विमा योजना – अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2025
माळेगाव : दि. माळेगाव सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांसाठी सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी समूह आरोग्य विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत इच्छुक सभासदांनी दि. 5 मार्च 2025 पर्यंत आपले अर्ज शेती विभागाकडे भरून जमा करावेत, अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

सभासदांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने ही योजना राबवली जात असून, अधिकाधिक सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
