तुला मिळवता मिळवताजीव कासावीस व्हायचाअंगातून पाझरलेला घाममातीत मिसळून जायचा.

0
216

तुला मिळवता मिळवता
जीव कासावीस व्हायचा
अंगातून पाझरलेला घाम
मातीत मिसळून जायचा.

भूक नावाची अवदसा

पोटात थयाथया नाचायची
माझ्या संयमाची परीक्षा
दररोज ती बघायची.

 तुला हस्तगत करण्या

प्रयत्नांची शिकस्त करायचो
ठणकावून पुन्हा सांगतो
वाट ईमानदारीची धरायचो.

 आज माझ्या टोपल्यात

आरामात विसावली आहेस
पाहून माझ्या प्रयत्नांना
मनातून सुखावली आहेस.

  वचन देतो गे भाकरी

भूतकाळ विसरणार नाही
आजचा रुबाब दाखवून
अजिबात माजणार नाही!…

माहीत नाही कोणी लीहली पण सत्य आहे म्हणून …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here