तुकोबांच्या दिंडीत विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी करणार सायबर जागृतीचे काम – डॉ.भरत शिंदे

0
70

तुकोबांच्या दिंडीत विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी करणार सायबर जागृतीचे काम – डॉ.भरत शिंदे
बारामती: विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकर्‍यांबरोबर वारकरी होऊन सायबर सुरक्षित दिंडीच्या माध्यमातून सायबर जनजागृतीचे काम करणार असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी केले आहे.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षित दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये वारकर्‍यांमध्ये सायबर जागरूकता करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध उपक्रम राबवणार आहेत. दैनंदिन जीवनात होणार्‍या वेगवेगळ्या सायबर समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय करावे? व काय करू नये याबद्दल विद्यार्थी वारकऱ्यांमध्ये सायबर जागृतीचे काम करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त पण सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन डॉ.शिंदे यांनी केले आहे.
सदरची सायबर सुरक्षित दिंडी ही जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर बारामतीत येणार आहे. या दिंडीसाठी सलमा शेख, शिक्षक समवायक, क्विक हील फाउंडेशनचे क्लब मेंबर आणि विद्यार्थी नियोजन करणार आहेत.
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार, बी.एस.सी.(संगणक शास्त्र) विभाग प्रमुख गजानन जोशी, बीसीए (सायन्स) विभाग प्रमुख किशोर ढाणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे, अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here