डाॅ. रघुनाथजी अनंतराव माशेलकर पद्मविभूषण (शास्त्रज्ञ)यांची मुलाखत
बुध्दीची वृध्दी. !जिवनाची समृध्दी !! २४/६/२०२३ रोजी गणेश कला क्रीडा स्वारगेट,पुणे येथे चैतन्य ग्रुपने कार्यक्रम घेतला होता न भुतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला.बुध्दीचा विकास व सामाजिक प्रबोधन हाच मुख्य आशय होता.
जिवसृष्टीतील जीव जन्माला येतो तेव्हा त्याची बाह्यांगा बरोबर बुध्दीची वाढ होत असते.बाह्यांगाची वाढ होताना आम्ही संवर्धनाकडे जसे लक्ष देतो तसे बुध्दीच्या विकासाकडे हि लक्ष दिले पाहिजे.
बहुसंख्य ठिकाणी परिस्थितीचा बाऊ केला जातो.वातावरणाचा देखील परिणाम होतो.त्या वातावरणातील बाहेर पडण्याचा विचार आम्ही केला तरच आम्हाला बुध्दीचा विकासाकडे लक्ष देता येईल.त्यातुन निश्चितच
बुध्दीचा विकास होत असतो.
आदरणिय डाॅ. रघुनाथजी अनंतराव माशेलकर पद्मविभूषण (शास्त्रज्ञ)यांची मुलाखत आदरणिय डाॅ.सागरजी देशपांडे यांनी अत्यंत कुशलतेने घेतली
मुलाखतीतुन आद. रघुनाथजी माशेलकर यांनी जीवनाचे एकेक पैलु उलगडले.वडीलाचे छत्र हरपले.गोव्यातील माशेल हे गाव सोडुन आई त्यांना मुंबईला घेऊन आल्या. आपल्या इच्छाशक्तीने व ध्येयवादी विचारांने त्यांनी दारिद्र्याला झाकुन टाकले ते झोकुन दिले व स्वतःला झोकुन त्या जमेल ते काम करु लागल्या.
त्या स्वाभिमानी होत्या तरी मुलाच्या आठवीतील शालेय प्रवेशासाठी त्यांनी मैत्रीणी कडे २१ ₹ मागितले कुठ झुकायचे व कुठे ताठ मानेने जगायचे हे त्यांना लव्हळ्या सारखे चांगले ठाऊक होते. त्यामुळे,मुलाला कुलाची व देशाची मान कशी उंचावेल हेच अंजली मातेने शिकवले होते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी अशी त्यांची माता अंजली हि मायमाऊली होती.छत्रपती शिवाजीराजे यांचे शौर्य शिवरायांचा आठवावा प्रताप म्हणतो,तेव्हा माॅ जिजाऊंचे स्मरण करतो.कुटुंबाला समाजाला देशाला घडवायचे असेल तर आधी स्री शक्तीतीच्या बौध्दिक, मानसिक,शारीरिक क्षमतेचे संवर्धन केले पाहिजे.शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी
ज्या विद्यार्थ्यांने रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथल्या उजेडात तर वयाच्या बाराव्या वर्षी ज्याला पायात चप्पल मिळाली तो विद्यार्थी आज पद्मविभूषणने सन्माननीत तर आहेतच त्याच बरोबर जगातल्या शास्त्रज्ञांचे देखील नेतृत्व करतात.यांचे यश पाहता माध्यमिक परिक्षेत जर ३०,००० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आले.पोटाच्या भुके पेक्षा त्यांची ज्ञानाची भुक मोठी होती.
केवळ पोटाची भुक भागविणाऱ्याला आपण खादाड म्हणतो.एवढंच नाही तर खायला कहार अन् धरणीला भार म्हणतो.परंतु जे ज्ञानाची भुक भागवत असतात ते ज्ञानी विचारवंत होतात.व धरतीचा भार काही अंशी उचलतात अनेक महानुभवाचे अनुभव आपण वाचतो.त्यांनी अनवाणी पायाने शाळेत जाऊन म्युनिसिपालीटिच्या शाळेत शिकुन त्याच म्युनिसिपालीटिच्या दिव्याच्या प्रकाशित अभ्यास करुन यश संपादन केलेले आहे.एवढेच नाही तर पोटाची भुक भागविण्या साठी पाण्यात पीठ घालून आईने दुध म्हणुन पाजले.ते दुध नसले तरी तीच आई त्यांना शुध्द ज्ञानामृत पाजत होती.त्यातुनच ते निरक्षीर विवेक शिकतात.
सुष्टिच्या कर्तव्याचे निसर्गाने जेव्हा एखाद्या जीवाला जन्माला घातलेले असते. तेव्हा त्याचे ठायी मेंदु हा देखील दिलेला असतो.मेंदु हा संगणका सारखा आहे.तो एक हार्डवेअर असला तरी त्यात अनेक स्पाॅटवेअर असतात.याच बौध्दिक क्षमते बद्दल डाॅ.माशेलकर यांनी त्यांचे स्नेही उदय गुजर यांचा ८वर्षाचा मुलगा वेद गुजर यांच्या बौध्दिक क्षमतेच उदाहरण सांगितले. त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तो चुटकी सरशी सांगत होता.याचाच अर्थ त्याने ते कधी तरी वाचले होते.ऐकले होते.म्हणजे ते त्यांच्या संगणकावर फिड होऊन सेव्ह झाले होते.हे कायम स्वरुपी सेव्ह असते.
एखाद्याला आठवले नाही तर आपण सहज म्हणतो,मेंदुला ताण दे.म्हणजे ती फाईल शोध.आपण उतारवयात देखील बालपणाच्या आठवणी साठवुन ठेवलेल्या सांगत असतो.म्हणजेच त्या फाईल शोधुन वाचत असतो.
आम्ही लेखक देखील विविध फाईल सेव्ह करुन ठेवत असतो व त्यातुन कथा, कादंबरी,लेख या फाईल तयार करीत असतो.
मानवी जिवनात स्मृतीभ्रंश झाला समजाच त्यांच्या संगणकातल्या फाईली करप्ट झाल्या.असे का,होते तर अनेक कारण असु शकतात,महत्वाचे कारण तुम्ही संगणकाचा वापर बराच कालावधी पर्यंत केलेला नसतो.म्हणुन माणसाने सातत्याने कार्यक्षम असलेच पाहिजे.
या बद्दल डाॅ.माशेलकर यांनी आद.इंदिराजीचे उदा. सांगितले,त्यांचे सचिव पार्थ सारथी हे त्यांना फाईल वाचुन दाखवत होते.त्याच वेळी इंदिराजी ह्या फाईल वाचत असत याचाच अर्थ दिवसाला चोवीस तासांच्या हि पुढे त्या नेऊ शकत होत्या म्हणजेच क्षितिजा हि पलिकडे त्या पाहत होत्या.हेच तंत्र डाॅ.माशेलकरानी आत्मसात केले.
बौध्दिकतेच आम्ही संवर्धन केले पाहिजे.त्यातुन विकास होत असतो.आमचा संगणकाने सातत्याने वाचन,लिखाण आसमंतातील घटना सभोवतालची परिस्थिती सतत टिपत राहिले पाहिजे.
मेंदुचा विचार केला तर आम्ही हादरुन जाऊ व विचार केला नाही तर तो बधिर होऊ.
बाल शिक्षण व बल शिक्षण व्यक्तीच्या विकासाचा भाग सामाजिक प्रगतीचे राष्ट्र बलशाली होण्याचा मुळ गाभा असतो.हाच,पाया हा बाल शिक्षण ते बल शिक्षण हा आहे
वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले,यांनी देखील शिक्षण हाच गाभा प्रथम समाजापुढे मांडला होता.विद्येविना मती गेली,मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे अनर्थ केले विद्येने
विद्या संपादन करण्याचे वय हे बाल वयापासूनच असते. ओल्या मातीला सहजा सहजी आकार देता येतो. वंदनिय मुक्ता साळवे यांनी बाल वयातच आपल्या दुःखाच्या वेदना मांडल्या होत्या.संत ज्ञानदेवानी वयाच्या सोळाव्या वर्षी पसायदान लिहले.तर शिरिष कुमारांनी देशाच्या स्वातंत्र्याचा विचार केला
बाल वयातच योग्य वातावरण निर्मीती झाली,तर विचाराला आचरणाला योग्य दिशा मिळते.(अर्थात शिक्षण हे मरेपर्यंत घेता येते)योग्य वेळी योग्य दिशा ठरविली तर त्या दिशेने विकासाची वाटचाल करता येते.
त्यासाठीच आम्ही बाल शिक्षण व त्या पायावर उभी होणारी इमारत बल शिक्षण आम्हाला घडविता येऊ शकते.त्या दृष्टीकोनातून विचार मांडण्याची माझा हा प्रयत्न आहे.बाल शिक्षणात बुध्दीचा विकास घडविण्या साठी आम्ही ध्येय समोर ठेवले पाहिजे.
बुध्दी हि उपजत क्षमता आहे.या क्षमतेचे प्रत्यक्षात मुल्य मापण करता येत नसले तरी.ज्यात बुध्दीचा वापर होतो.अशा कृतीतून अप्रत्यक्षरीत्या तिचे मुल्यमापण केले जाते एखाद्या व्यक्तीने किवा व्यक्ती समुहाने अनेक वर्षे वारंवार बुध्दीमापण कसोट्या देऊन त्याने प्राप्त केलेल्या गुणावरून बुध्दीचा विकास कसा होतो हे पाहता येते.
बाल शिक्षण व त्यातुन बल शैक्षणिक बल ते अर्थाजन निर्माण करणारे रोजगार, उद्योजक,ज्ञानी लेखक इ. प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देणारे,शासकिय राजकीय क्षेत्रातील जम निर्माण करणारे असे अनेक प्रकारचे बल शिक्षण देऊन आम्हाला पिढी घडविता येते ती आम्ही पिढी घडविली पाहीजे.
त्यासाठीच शिक्षणाचा पाया तयार असणाऱ्या व तो भक्कम करू इच्छिणाऱ्या युवकानी सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे आले पाहिजे.त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न हा समाजातील धनदांडग्यांनी विचारवंतानी सोडविला पाहीजे.प्रशिक्षित समाज व्यवस्थे शिवाय समाजाचा राष्ट्राचा विकास होऊच शकत नाही.
आजचे आमचे समाजकार्य हे केवळ बेगडी व मलमपट्टी करणारे असे आहे.त्यामुळे प्रत्येक कालखंडात संघटना निर्माण होऊन हि आम्ही ठोस अशी सामाजिक प्रगती करू शकलो नाही. समाजाला दिशा दाखविण्या चे कार्य करता आले नाही.
बाल शिक्षणासाठी पोषक असे वातावरण कसे असते याचा विचार करून विविध वयोगटातील मुलांमधील मानसिकतेचा बौध्दिक क्षमतेचा विचार केला पाहिजे मुलामध्ये शब्द ग्रहण करण्याचा उपजत गुण असतो.त्यातला आई हा शब्द तो प्रथम उच्चारता.
जस जशी शारिरीक वाढ होते तशी बुध्दीची वाढ होते शब्द संपत्तीचे भांडार तयार होत असते.परंतु आम्ही त्याकडे डोळसपणे पाहत नाही.त्यामुळे त्याची जाण होत नाही डोळसपणे पाहीले तर त्या जाणिवेतून उरी बाळगलेले लक्ष गाठता देखील येते याचे अनेक उदाहरणे देता येतील
मुलांच्या वयोगटातील शब्द संपत्तीचा विचार केला तर जेव्हा आम्ही त्याचा पहिला वाढदिवस साजरा करतो तेव्हा त्याला शिकविण्या साठी त्याच्याकडुन शिकण्या सारखे कौतुकास्पद असे बरेच काही असते. वय वर्षे १जेव्हा असते तेव्हा त्याची शब्द संपती हि मुळ शब्द ५,६०० वय वर्ष ५ मुळ शब्द ९,६०० वय वर्ष ६ मुळ शब्द १४,७०० वय वर्ष ७ मुळ शब्द २१,२०० वय वर्ष ८ मुळ शब्द २६,३०० वय वर्ष १० मुळ शब्द ३४,३०० वयानुसार वरील प्रमाणात शब्द संपती जतन करण्याची बौद्धिक क्षमता मुलांमध्ये असते.
परंतू दुर्देव हे असते की, योग्य वेळी योग्य शब्दाचा विकास व त्यात असणारे त्याचे भविष्य या शब्दाचा वापर त्याला न शिकवता पिढ्यानपिढ्या चालत नाते गोते केवळ पुस्तकी ज्ञान ओव्या न शिकवता शिव्या नको ते शब्द प्रयोग शिकवतो. त्या वातावरणात त्या बाबीचा अर्तंभाव असणारे शब्द मुलाला शिकवत असतो व त्यातुन त्याचे कौतुक हि करीत असतो. परंतु त्याच्या भविष्यातील वाटचालीला जडण घडणीला समाजाच्या प्रगतीसाठी काय दिले पाहिजे याचा विचार करीत नाही.
याच वयात सामाजिक विचार मानवधर्म किवा समाजातील प्रगत विचार जे शिकवतात तेच ती मुले शिकत राहतात व तसेच ते घडतात.तर काही विपरीत शिकुन समाजाला अधोगतीला नेतात.सदविवेकाचे शिक्षण प्रगतीच्या दिशेने पुढे नेत असते
सृष्टीच्या निर्मात्याने बाल्यावस्थे पासुन संगणक दिला त्यात आम्ही कोणते स्पाॅप्टवेअर लोड करतो त्यावर वरुन संगणकाचा वापर कसा ठरवता येतो.
सामाजिक परिवर्तनाच्या दिशेसाठी बाल शिक्षण त्यातुन बल शिक्षण याचा विचार क्रमाक्रमाने मांडण्याचे प्रयत्न परिवारात समाजात केले पाहिजे. त्याचा आधी मेंदूवर आणि कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतो.
काही पालक आपल्या पाल्या बद्दल सांगतात तो अभ्यास करतोय,पण लगेच काही वेळात विसरतोय. हुशार आहे, पण गुण कमी मिळतात व कमी बोलतो. पण याच्यात आणि इतर समवयस्क मुलांमध्ये फरक मात्र चटकन जाणवतोय. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करू? काही चाचण्या केल्या तेव्हा त्या मुलाची समस्या लक्षात येते.
जेव्हा हा संगणक मातेच्या उदरात ॲसेबल होत असतो. तेव्हा त्यांचीच कुपोषणाने उत्तम जडणघडण होत नाही
त्याचे कुपोषण होत राहिल्या मुळे त्याच्या मेंदूच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत. परिणामी त्याचा मेंदू अपेक्षित क्षमतेने काम करू शकत नाही.
यासाठी जसे आम्ही संगणक घेता उत्तम प्रतीची कंपनी त्यांचे उत्पादक पाहतो.तसे त्या बालकाला घडविणारी माता योग्य हि सक्षम सदृध्ढ असली पाहिजे.आम्ही पिढ्यान पिढ्या स्त्रीला गौण दर्जा दिला ती माता आहे जननी आहे ती जन्म देऊन घडवित असते तिच्या शारीरिक मानसिक संवर्धनाकडे आम्ही पाहिले नाही.
एक बाब आम्ही जाणुन घेतलीच पाहीजे.निसर्ग निर्मित जी प्रक्रिया असते. निसर्ग ज्या जिवाला जन्माला घालत असतो.तिथे त्याचा मापदंड नैसर्गिक देण हा सारखीच असते तिथे भेदभाव होत नसतो.
मेंदीची रचना जाणुन घेतली तर आकलन शक्ती ती वाढविण्यासाठी मेंदुची होणारी वाढ जाणुन घेतली की,त्यांचे कार्य कसे चालते हे देखील जाणुन घेता येईल.
मेंदूचा विकास हा टप्या टप्प्याने गर्भाच्या वाढीनुसार होत असतो.मेंदूच्या योग्य विकास होत असताना मातेचे आचरण,आचार विचार,आहार,व्यायाम, झोप, ध्यान, साधना तसेच काही संशोधना नंतर विज्ञानावर आधारीत बाबींकडे हि पाहिले पाहिजे, त्यावरच आधारीत गर्भाच्या जिवात परिणाम होत असतात.तो जीव विकसित होत असतो.
अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या अपत्याला जन्म देणे हे शक्य होत असते. गर्भातील जीवाची जेव्हा शारिरीक वाढ असते तेव्हा मेंदुची देखील वाढ होत असल्यामुळे गर्भ वाढविणाऱ्या मातेच्या भावना तिचा आहार व्यवहार याचा त्या गर्भाच्या मेंदुच्या वाढीवर परिणाम होत असतो.सुरवातीच्या काळात परिणामांचा प्रभाव तितकासा होत नसतो गर्भ जेव्हा पाच महिन्यांचा होतो तेव्हा मात्र तो परिणाम जलद गतीने होत असल्या मुळे याच काळात मातेची काळजी घेतली तर तिचे मातृत्व गर्भावर योग्य परिणाम करीत असतात.
माता हि केवळ उदरातील गर्भ अवस्थेतच संस्कार करीत असते असे नाही तर तो जीव जन्माला आल्या नंतर त्याच्या अंगी उत्तम जाण येई पर्यत किमान सोळा सतरा वर्षा पर्यंत माता संस्कार करीत असते.
याच काळातील बाळाच्या जन्मानंतर पाच वर्षेपर्यंत मेंदूच्या नैसर्गिक विकास होणारा काळ महत्त्वाचा असतो.याच काळात मनुष्याच्या जीवनाला खरी दिशा मिळत असते.या काळात मिळणाऱ्या शिक्षणाला आपण बालवाडी शिक्षण म्हणतो ते खरोखरीच सार्थ आहे
या सुरवातीच्या काळातील जडणघडणीवर मनष्याच्या जीवनाची दिशा बदलवू शकते वयाच्या १६ वर्षांनंतर जशी मनुष्याची शारीरिक वाढ उंची वाढत नाही त्याचप्रमाणे वयाच्या पाच वर्षापर्यंतच मेंदूचा स्थापत्य-विकास होतो, नंतर तो तितकासा परिणाम कारक होत नाही.
या विकसित काळात मुलां साठी नेमके काय व कसे करायचे याविषयी अनेक पालकांना जाण नसल्यामुळे अपेक्षित विकास होत नाही. पालक या काळातील त्या बालकांचे हसणे-खेळणे बोबडे बोल हेच कौतुकाचे वाटत असतात.त्यातच ते समाधानी असतात.फार तर ते बाह्यांग व शारिरीक आजार याची काळजी घेत असतात.मेंदुची देखील वाढ होत असते व त्याला पोषक अशा बाबींकडे विशेष लक्ष दिले जात नाही
आधी गरोदरपणात अलौकिक बुद्धिमत्ता व मानसिकता असलेल्या बाळाचा जन्म होण्यासाठी योग्य चाचण्या करण्यावर भर दिला पाहिजे पाच वर्षे वयाखालील मुलांचा मेंदू विकास नीट होतो आहे की नाही, त्याची तपासणी लवकरात लवकर करणे आवश्यक असते.
तसेच मुलांच्या मेंदूचा उत्तम विकास साधण्यासाठी पालकांनी प्रशिक्षण घेणे दुसऱ्या वया पासुन पाच वर्षे पूर्ण व पुढे दहा वर्षावरील वयाच्या मुलांना व बालपणात मुलांचा नीट सर्वांगीण विकास व्हावा व संस्कार व्हावेत म्हणून पालकांनी प्रशिक्षण घ्यावे व संपर्कात राहाणे चांगले. कारण काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करणे पाच वर्ष वयाच्या आतच महत्त्वाचे ठरते.
मेंदूच्या प्रत्येक विभागाचा नीट विकास होण्यासाठी पाच वर्षाखालील मुलांचे सुद्धा विशेष प्रशिक्षण असते पण अपेक्षित परिणाम साधण्यासाठी मुलांच्या पालकांना प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक ठरते.
मेंदूमध्ये प्रत्येक ज्ञानेंद्रिया साठी एक स्वतंत्र रचना असते.उदा.कानावर पडणाऱ्या शब्दांचे श्रवण करणे.स्पर्श ज्ञान शरीराला होणाऱ्या स्पर्शाच्या संवेदना, आहाराचे सेवन त्यातील पदार्थांची चव वातावरणातील वास सुवास सारांश नाक कान डोळे पंच इंद्रियांची कार्यपध्दती यांची जाण त्यात भाषा आचार विचार यांचे संवर्धन होत असते.
निसर्गातीत प्रत्येक घटकाची वाढ हि टप्प्या टप्याने होत असते.त्यामुळे जसं जसे बालकांचे वय वाढत जाते तस तसे त्यांच्या स्वभावात त्यांच्या आकलन शक्तीत होणारे बदल यावर पालकांनी निरिक्षण करणे हि बाब अत्यंत महत्त्वाची आहे.याअभ्यास केलाच पाहिजे या बाबतीत पुरेज्ञान अवगत नसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
पालक विद्यार्थ्यांकडुन उत्तमच नाही तर भरमसाठ मार्काची अपेक्षा करीत असतात.परंतु पालकांनीच नेमके काय केले पाहिजे हेच पालकांनी जाणुन घ्यायला हवे.
आठव्या,नवव्या, दहाव्या वर्गात योग्य करिअरची निवड करण्यासाठी मेंदूच्या कार्यक्षमते बाबत किमान ६/७ तास तरी त्याला ताण देऊन एक प्रकारे त्या व्दारे परीक्षाच म्हणा घ्यायला हवी. लागतात.त्यापेक्षा कमी वेळेत आम्ही निकाल अपेक्षित ठेवला तर तो कसोटीस उतरेल की नाही याची शाश्वती नसते.
केवळ मुलांच्या आवडी प्रमाणे करिअर निवडणे योग्य ठरत नाही कारण त्यांच्या मेंदूचा विकास पुर्णपणे झालेला नसतो.
तसेच विद्यार्थ्याची आवड हि त्यांच्या वयानुसार ऐकीव माध्यमातुन निर्माण झालेली असते किंवा ती त्यांची स्वताची असली तरी ती परिपक्व अशा विचारातुन निर्माण झालेलीच असतेच असे नाही.
विद्यार्थ्यांचा अती आत्मविश्वास,भावनिक दबाव,पालकांना मिळालेली अपुरी माहिती यामुळे पालकांची निर्णय क्षमता कमजोर असते.करियरची संधी अफाट आहे हजारो करीअर बद्दल माहिती उपलब्ध असली तरी त्यातील यश हे निश्चित असेल हि शाश्वती नसते. कारण त्या अन्य पोषक बाबींची असणारी साथ देखील महत्वाची असते.
मेंदु जगण्याचा केंद्र बिंदु
शिक्षणाचा
विचार आम्ही करताना बाह्य परिस्थितीचा जसा विचार करतो तसा विचार शारीरिक वाढीचा देखील केला पाहिजे. शारिरीक क्रियेचे नियंत्रण त्याची चालना हि मेंदु मुळे होत असते. मानवी प्रगतीच्या शिक्षणाचा अभ्यास करताना मेंदुला पोषक अशा बाबीचा आम्हाला मेंदुचा विकास करण्यासाठी अभ्यास करावाच लागेल.व त्यावरून शिक्षणाचा जागर करता समोरच्या व्यक्तीचा विकास करताना त्याच्या बौध्दीक क्षमतेने नुसार त्याचा विकसित जिवनाचा नेमका मार्ग व्यक्तीला व सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला ठरवता येईल.
संगणिक भाषे प्रमाणे मेंदुच्या बौध्दीक क्षमतेचा विचार करू हि क्षमता २.५ पेटा इतकी असते त्याचे प्रमाण १पेटाबाईट=१००० टेराबाईट १ टेराबाईट १००० जीबी एका मोबाईल मध्ये आपण ६४ जीबीची क्षमता ग्राह्य धरली तर किमान ४०,००० मोबाईल म्हणजे एक महासंगणकच निसर्गाने आम्हाला दिला. एवढेच नाही तर त्याची गती हि प्रती सेकंद ३८ हजार वेळा कार्यान्वित होत असते.म्हणुन मेंदुला निसर्गाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकासारखा महासंगणक म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळे मानवाचे मन हा त्याच्या व्यक्तीमत्वाचा आरसाच असतो.
आमच्या जवळच्या मोबाईलचा विचार केला तर त्याचा वापर कशासाठी आम्ही करतो.त्यावरून काय शिकतो त्यात कोणता डाटा संग्रहित करतो तो बिघडु नये म्हणुन कशी काळजी घेतो असेच आमच्या. बौध्दीकतेचा विकास होण्यासाठी आम्ही मेंदु हा मोबाईल कसा वापरतो यावर शैक्षणिक विकास ठरवता येईल.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता