बारामती प्रतिनिधी :-
बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पत्नी सौ. हेमलता गुजर यांचं आज अल्पशा आजारामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान, आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
हेमलता गुजर या भाभी या नावानं सर्वत्र परिचित होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.