जाती अंताच्या उंबरठ्यावर जाण्यासाठी मानसिकतेचा पाया मजबूत करू

0
5

जाती अंताच्या उंबरठ्यावर जाण्यासाठी मानसिकतेचा पाया मजबूत करू
महाराष्ट्र नावातच महा-राष्ट्र आहे.संताची,महंताची, छत्रपतींची शिवरायाची,माॅ जिजाऊ,माता अहिल्याबाई होळकराची शाहु.फुले, सावित्रीमाई डाॅ बाबासाहेब आंबेडकराची,महात्मा गांधींची सावरकरांची,वि.रा.शिंदेंची, संताची तर मांदीयाळी सेना न्हावी,चोखा महार,गोरा कुंभार,सावतामाळी नामदेव शिंपी जगनाडे तेली,मातंग आजामेळा,जनाबाई, ज्ञानोबाची,तुकोबांची कबीराच्या विचारधारेची, आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवेची,साहित्य रत्न आण्णा भाऊची,शाहीर अमर शेखाची किती तरी ज्ञात अज्ञात वंदनिय महामानवाची
अशी हि भुमी तरी हि माणूसच माणसापासुन जात पुढे करून मागे जात आहे. हिस्र श्वापदानी करावे असा अन्याय निरापराधावर दुर्बलांना होत आहे.

मानव म्हणुन जगत असलो तरी अन्याय झालेल्यांची जात पाहून त्याच जातीच्या लोकांनी न्याय मागायचा ज्याचं सर्वस्व जात (जळत) त्यांचीच पेटुन उठते जात (कळत) किती दिवस आम्ही जातीच्या कोंडाळ्यात अडकुन राहायचं आता तर वंदनिय पुज्यनिय दैवता समान मानवांना हि जातीच्या कोंडाळ्यात अडकुन ठेवु लागलो.

अभिलाषा परीवर्तनाची,भाषा पुरोगामी मानसिकता मात्र प्रतिगामी,कोणाला द्यायची शिवी! कोणाची गायची ओवी! जातीच्या नावावर शिवाशिवी!देह मात्र सर्वांचा एकच मानवी!

परिवर्तनाची इमारत उभी करायची असेल तर मानसिकतेचा पाया मजबुत असला पाहिजे.परंतु आमच्या मानसिकतेचा पाया जातीयतेच्या दलदलीत काल होता.आज आहे.उद्या राहू नये यासाठी आजच आम्ही किमान जातीअंताच्या उंबरठ्यावर तरी पाय ठेवण्याची तयारी दाखवली पाहीजे.

जात हि एकदम जाणार नाही जाऊ हि नये कारण पिढ्यान पिढ्या काही जातीने अतोनात हाल भोगले मानवी जिवन हे त्यांच्या वाट्याला आलेच नव्हते असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.अशा जाती समुहाला सामाजिक समता मिळेपर्यंत तरी जाती समुह राहीले पाहीजे. त्यासाठी आरक्षण आहे तो पर्यंत जाती समुह राहिले पाहिजे.पुर्वी धंद्यावर आधारीत जात होती.आता जातीवर आधारीत धंदे राहिले नाही.धंद्या बरोबरच जातीच अस्तित्व कालबाह्य झाल असेल तरी सामाजिक समतेच्या अस्तित्वासाठी जात हि काळाची गरज आहे.

त्यामुळे आम्ही किमान जातीअंताच्या उंबरठ्यावर जाण्यासाठी जात जिवंत न ठेवता जाती समुह समता प्राप्त होई पर्यंत ठेवू शकतो. त्याचे वर्गिकरण करून

उदा.भारतीय घटनेच्या कलमा प्रमाणे अनुसुचित जातीची सुची तयार केली.५९ जातीला समाविष्ट करून त्यासाठी १३% आरक्षणाची तरतुद केली.त्याच प्रमाणे अनुसूचित जमाती सुची तयार करून ४७ जमातीसाठी ७% आरक्षणाची तरतुद केली.भटक्या विमुक्ता साठी देखील‌ तरतुद केली.

जाती अनंताच्या उंबरठ्यावर कसे जाता येईल.अनुसुचित जातीच्या सुचिमध्ये ५९ जाती असल्या तरी प्रामुख्याने चार जातीची संख्या अधिक आहे. नवबौध्द,मातंग,चर्मकार,
वाल्मिकी हे चार जाती समुह ठेवून इतर ५५ जातीची त्यांची प्रगती अवस्था इतर काही जाती समुहाशी थोडेफार साम्य असणारे निकष लावुन या चार जाती समुहात जोडता येतील.
५४ जातीची वर्गवारी करून चार समुहाला जोडल्या नंतर विशिष्ट जात म्हणून त्या जातीचा उल्लेख न करता तो त्या जातीचा समुह म्हणून त्यांचा उल्लेख व्हावा.

नवबौध्द,मातंग,चर्मकार, वाल्मिकी हे चार समुह तयार झाल्या नंतर त्या जाती समुहाचा उघड उल्लेख न करता जाती समुहाला कोड नंबर किवा मुळाक्षरा प्रमाणे वर्गवारी केली तर जातीचा सातत्याने उघड उघड होणारा उल्लेख टाळले जाईल. कागदोपत्री पुरावा देण्याची जातीचे व्हेरीफिकेशन करण्याची वेळ आली.त्या वर्गवारीतील जातीचा विशिष्ट उल्लेख न करता त्याजागी समुहातील जात एवढा उल्लेख करून संबंधीत कामकाजासाठी दाखला देण्यात यावा.

उदा अनुसूचित जाती मध्ये नवबौद्ध,मातंग,चर्मकार, वाल्मिकी असे चार जाती समुहाचे गट पाडले तर या समुहाचा देखील जाती समुह म्हणून उल्लेख न‌ करता समुह १ किंवा समुह अ,समुह २ किवा समुह ब‌,समुह ३ किंवा क,समुह ४ किंवा ड अशा प्रकारे रचना केली तर जातीचा उल्लेख हा टाळले जाईल.

अनुसूचित जाती समुह १,२,३,४ अ,ब,क,ड असाच उल्लेख होत राहील.आज जे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या जातीच्या नावामुळे जात हि समाजाच्या मुखा मुखात प्रचलित झाली आहे. या ऐवजी जर वर्गवारी करून कोडींग पध्दत अवलंबली तर जातीचा उल्लेख होणार नाही व कोडींग पध्दतीचं संशोधन‌ करून‌ जातीचा उल्लेख करण्याच्या भानगडीत फारसे कट्टर जातीयता पाळणारे कोणी फुरसे पडणार नाही.

त्याच प्रमाणे शासकिय लाभ देताना शासनाकडे देखील कोणत्या समुहाला किती लाभ दिला यांचे गणित‌ सांख्येकिक पध्दतीने मांडता येईल‌‌.त्यातुन जातीअंताकडे जाण्याला योग्य दिशा मिळेल.त्यातुन पिढ्यान् पिढ्या चिकटलेले जातीचे लेबल पुसटसे तरी काही अंशी होतील

अनुसूचित जाती मध्ये आज‌‌ ज्या ५९ जाती आहेत त्या जातीचे अस्तित्व राहील.परंतु वारंवार जातीचा उल्लेख होणार नाही. त्या ऐवजी चारच जाती समुह प्रचलित राहतील.

अशीच रचना अनुसूचित जमातीच्या भटक्या विमुक्ताच्या इतर मागासवर्गीयाच्या
समुहात करता येईल.

पुरोगामी विचारांची इमारत मजबुत करायची असेल तर मानसिकतेचा पाया मजबुत करावा लागेल.आज जातीच्या नावावर त्याचा वारंवार जप होऊन जातींना अवहेलना भोगावी लागते.जातीय दरी निर्माण होत आहे.किमान‌ ते‌‌ न होता कोणत्या जाती समुहात एवढीच ओळख पुढच्या पिढीला सांगावी लागेल.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here