जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर अनधिकृत डिजे आणि कमानी न लावण्याचे आवाहन

0
59

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर अनधिकृत डिजे आणि कमानी न लावण्याचे आवाहन

बारामती, दि.३: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर शहरात गतवर्षी अनधिकृत डिजे आणि कमानींमुळे अडथळा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत डिजे आणि कमानी लावू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे. परवानगीशिवाय डिजे आणि कमानी लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारामती शहरात गतवर्षी अनधिकृत डीजे आणि कमानी उभारल्यामुळे पालखी विश्वस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी शहरात ६ आणि ७ जुलै रोजी असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पालखी मार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या अनाधिकृत कमानी आणि विनापरवाना डिजे उभे करु नये. विनापरवानगीशिवाय डिजे लावणाऱ्यावर तसेच डिजे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे डिजे लावण्यापूर्वी परवानगी घेऊनच तसेच नियमांचे पालन करून लावावेत.

परवानगी घेतलेल्या कमानींमुळेही पालखी मार्गात पालखीला अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. घोळवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here