HomeUncategorized'चला जाणूया नदीला’ अभियानात जिल्हा परिषदेचा सक्रीय सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश...

‘चला जाणूया नदीला’ अभियानात जिल्हा परिषदेचा सक्रीय सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

‘चला जाणूया नदीला’ अभियानात जिल्हा परिषदेचा सक्रीय सहभाग- मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

पुणे, दि. २: नद्या या मानवी संस्कृतीसाठी कायमच महत्त्वाच्या राहिल्या असून आताच्या आणि भावी पिढीच्या अस्तित्वासाठी त्यांचे प्रवाही राहणे गरजेचे आहे; यादृष्टीने जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले ‘चला जाणूया नदीला’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले.

जिल्हा परिषदेत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस जि. प. सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता आप्पासाहेब गुजर, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, जलबिरादरी महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुग, सदस्य सुमंत पांडे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी जलबिरादरीला जिल्हा परिषदेचे सर्व ते सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल. नदी यात्रा झाल्यानंतर प्राप्त सर्वंकष अहवालांच्या अनुषंगाने नदी पुनरुज्जीवनासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

नदी प्रवाही करण्यासाठी नदीला येऊन मिळणारे सर्व नाले, संरचना खुल्या करुन प्रवाहित करणे गरजेचे आहे; विविध नद्यांच्या पुनुरुज्जीवन प्रकल्पांमध्ये ही बाब प्रकर्षाने लक्षात आली असून त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.

बैठकीत श्री. चुग, श्री. पांडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महाराष्ट्रात या अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या नदी यात्रा तसेच विविध नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने विविध जिल्ह्यात राबविण्यात आलेले उपक्रम व नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांची माहिती दिली. अभियानात प्रत्येक नदीसाठी नदी प्रहरी नेमण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यात एकूण ११ नद्या या अभियानात समाविष्ट असून पवना नदी तसेच इंद्रायणी नदी यात्रा पूर्ण झाली असल्याचे श्री. चुग यांनी सांगितले. या दोन नद्यांच्या अनुषंगाने सद्यस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांचा सर्वंकष अहवाल तयार केला असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीत विविध अभियानाचे सदस्य तसेच उपस्थित नदी प्रहरी यांनी विविध सूचना केल्या. जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमीत पाथरवड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी यावेळी उपस्थित होते.
0000

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on