…..”गोपीका”…….

0
214

“कथा सरीता”- भाग-1
लेखक राजीवदा….

……..”गोपीका”…….

‘गोपीका’ ही एक अबला असहाय्य अशी एकाकी पडलेली,अन्याय आणि अत्याचारानं पिडलेली,सामान्य कुटूंबातील अनेक मुलींच्या वेदना सांगनारं प्रतीबींब आहे.
गोपीका’ ही कथा एक काल्पनीक पण वास्तवीक जीवनात घडत असलेल्या आत्याचाराला उघड करुन वाचकांच्या मेंदूत
फोडनी/तडका देण्याचा प्रयत्न आहे.
वाचक नक्कीच स्वीकारतील अशी आशा आहे…..

“गोपीका अगं गोपीका…कुठं गेली ही पोर ?.;
आई गोपीकाला हाक देत तीच्या पुढ्यातली कामं उरकन्यात दंग होती.
गोपीका मात्र शब्द कानावरती पडतायेत परंतू उत्तरादाखल इच्छा असूनही तोंड उघडत नाही अशी अवस्था करुन केवीलवाण्या नजरेने छताकडे फक्त एकटक पाहात काॅटवरती पडून आहे.
ज्वारी पाकडून दळनासाठी डब्यात भरुन रखमा गोपीकाच्या खोलीत आली .गोपीकाच्या चेहऱ्याकडे बघून डबडबल्या डोळ्याने तीने गोपीकाच्या चेहऱ्यावरुन हात फीरवला.”बाळा कितीदिवस स्वतःला असं कोंडून घेनार आहेस?,झालंगेलं विसरुन जा,आपल्या नशीबाला आलेला भोग आपल्यालाच भोगून संपवावा लागनार आहे.”
गोपीकाने निर्वीकार चेहऱ्याने छताकडून नजर वळवून एकदा रखमाकडं पाहीलं.किंचीत हास्यकेलं .”आई तू आणं तात्या माझा आधार हाय ना.म्हणूनच मी तुम्हादोघांकडं बघत जगतीया,नाईतर जगन्याची उलीशी सुदा इच्छा नाई बघ.”
रखमाने गोपीकाला छातीशी धरलं अन डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.
रखमाबाई अन तात्या शिवने हे जामखेड तालूक्यापासून जवळच असलेल्या बाभूळगावत राहत असलेलं दांपत्य सदाशीव आणि दादा ही दोन मुलं अन ही गोपीका एकुलती एक लाडकी मुलगी.या शिवने कुटूंबाचा संसारगाडा ओढनारी दोन चाकं कष्टाळू आहेत तात्या शिवने हा टमटम चालवतो तर रखमा ही फाटकं तुटकं, उसवलेली कपडे शिवून आलेल्या पैशातून संसाराला उभाकरन्यात मोलाची भूमीका बजावते आहे.
सदाशीव हा गोपीकाहून दोन वर्षाने लहान तर दादा हा शेंडेफळ आहे.
दुर्दैवाने दादाची बौधीक क्षमता अत्यंत कमी आहे.म्हणून त्याला सांभाळनं हे मोठं दिव्य काम त्या माऊलीवरती येऊन पडलं होतं.प्रपंच उभा करत सर्व जबाबदारी पार पाडत रखमाचा संसारगाडा पुढं पुढं सरकत आहे.मिळेल ते भाडं घेऊन जामखेडला जायचं,दिवसभर ईकडची तिकडची वाहातूक करायची अन दिवस मावळे पर्यंत दमून भागून घरी यायचं हा तात्याचा दिनक्रम ठरलेला.
आज गोपीका ही सोळा वर्षाची झाली.गेल्या दोन वर्षाखाली तीचं लग्नही झालं होतं पण करायला गेलो एक अन झालं एक गोपीकाचा नवरा एक वर्षापासून बेपत्ता झालाय ज्याची भीती वाटत होती तेच पुढ्यात आलं होतं.सदाशीव नववीच्या वर्गात शिकत आहे.लहानपण हे खेळण्या बागडन्याचं वय पण घरातल्या या उलटसुलट घटनांमुळं अकालीच त्याचं बालपन संपून एक समर्थ भावाची जबाबदारी त्याच्या अंगावरती पडली आहे.
आजपासून दोन वर्षापूर्वी एक गरीब परंतू सुखी कुटूंब,अगदी देवाला सुद्धा हेवा वाटावा असा हा शिवने परिवार बाभूळगावात सुखाने नांदत होता .
गोपीका आता माध्यमीक विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत होती. मैत्रीणींमधे रमने खूप अभ्यास करणाऱ्या मुलींमधेही तीच टाॅप असायची अभ्यासा बरोबर ती अनेक विवीध कला प्रकारात भाग घेऊन नेहमी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत असायची.वकृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,एकांकीका स्पर्धा अशास्पर्धांमधे गोपीका हे नाव अग्रगण्य असायचं.शितल ही गोपीकाची जामखेडमधेच राहाणारी वर्गमैत्रीन होती.सातवी पर्यंतची शाळा बाभूळगावातच केली होती यांदाच्या वर्षी आठवीसाठी जामखेडला हायस्कूल मधे प्रवेश घेतला होता.शितल खेळामधे आवड असलेली मैत्रीण आता गोपीकाला सोबती म्हणून होती खेळातल्या गोष्टी एकेक करुन तीच्या कडून गोपीकाला आईकायला आवडत असत.दररोजच्या ग्राऊंडवरच्या ताज्या अपडेट ऐकून गोपीकालाही खेळा बद्दलची उत्सुकता वाढत होती.आठवीचे वर्ष असल्यामूळे तीतकासा अभ्यासाचाही तान नव्हताच ऐके दिवशी शितलच्या आग्रहावरुन गोपीकाने खेळासाठी इच्छूक असलेल्या मुला-मुलींच्या यादीत आपले नाव नोंदवले. शालाअंतर्गत मैदानी खेळांच्या स्पर्धा जवळ आल्या होत्या सर्व खेळाडू कसून सरावात स्वतःला झोकून देत होते.तहानभूकेचीपण भ्रांत पडत होती.
गोपीकाला आता दररोज शाळेच्या नियोजीत वेळेच्या तासभर आगोदरच यावं लागत होतं.तात्याने घेऊनदिलेली साईकल हेच तीचं दररोजचं प्रवासाचं साधन होतं.पण ती साईकल चालवूनच दमून जाई.ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आली होती.पण काही मार्ग सुचत नव्हता शेवटी वर्गशिक्षकांनी गोपीकाला सांगून तात्याला शाळेत बोलावून घेतले आणि तीला काही दिवस साईकल पेक्षा वडापने शाळेत पाठवावे असा आग्रह केला.(वडाप म्हणजे खाजगी वाहातूक करनारे प्रवासी वाहान)आपल्या पोरीचं होत असलेलं कौतुक पाहून अन तीची आवड जपायची म्हणून तात्याने तीच्यासाठी प्रवासखर्च म्हणून दररोज वीस रुपये खर्चायचा निर्णय घेतला.बाभूळगावावरुन जामखेडकडं जानारी एक अॅटोरिक्षा होती. दररोजच्या जान्या येन्यानं त्या रिक्षावाल्या काकाशी गोपीकाची चांगलीच ओळख झाली .कधी गोपीकाला घरुन निघायला उशीरझाला तर ते रिक्षावाले काका गोपीकासाठी थांबायचे आतातर जास्तच ओळख वाढल्यामूळे ते घरिपन येऊ लागले होते. गोपीकाला त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटे. रखमा आणि तात्याशी पण त्या काकाची चांगलीच ओळख झाली.दोन मुलींचा बाप असलेला रिक्षावाला साधारण पस्तीशी ओलांडलेला असेल.त्यामूळे चिंता नव्हती .
मुलीबद्दल असलेली एकप्रकारची चिंता आता रखमाला आणि तात्याला हळूहळू कमी होत असलेली जानवू लागली ते निष्काळजी होऊन आपआपल्या कामात व्यस्त झाले. गोपीका आईचा निरोप घेऊन निघाली.शाळेत आज सुट्टी होती फक्त खेळाडूंनाच शाळेत बोलावलं होतं त्यामूळं इतर कोनी मुलं मुली आज गोपीकासोबत नव्हते.रिक्षा मैदानासमोर उभा राहीली शितल धावतच गोपीका कडे आली आणि म्हणाली अगं दफ्तर कशाला आणलं आहैस फक्त जेवणाचा डबा आणायला सांगीतला होता. आणलं आहेसच तर या काकांकडेच रिक्षातच ठेव तुझं दफ्तर.तीने त्या रिक्षावल्याकडे विनंती पण केली “काका राहूद्याना माझं दफ्तर रिक्षातच ..!”
“ठीक आहे” म्हणून रिक्षावाल्याने दफ्तर ठेऊन घतलं खरं पण तो आज मुद्दाम तीथेच थांबला. गोपीका ग्राऊंडवरुन पाहातहोती काका का बरं गेले नसतील दुसरं भाडं नाही का रिक्षाला? असं बरंच काही तीच्याडोक्यात येऊन जात होतं पण मन निर्मळ असल्यामूळं वाईट विचार तीला शिवतही नव्हता. ती खेळात रमत गेली. रिक्षा वाला मात्र आज बिथरला होता काहीतरी वाईट वृत्तीने तो आज घसरत चालला होता. .मुलीच्या वयाच्या जवळपास असलेल्या तेरा-चौदा वर्षाच्या गोपीकाकडे तो आज वाईट नजरेने पाहात होता.गोपीकाला आपल्या जाळ्यात ओढायची अन तीच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा उठवायचा हे त्याने मनोमन ठरवूनच टाकले होते. तो तीचं दफ्तर उचकू लागला तीच्या वह्या चाळल्या त्याची कपटीबुद्धी त्याला काहीतरी सुचवत होती .त्याने त्यातल्याच एका वहीचं पान फाडलं आणि त्यातलच अक्षर पाहून तशीच हूबेहूब अक्षराची ठेवन करत स्वतःच्या नावे प्रेमपत्र लिहीलं.
“I LOVE YOU काका मी तुमच्यावरती प्रेम करते.तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. “
अशी मानसीक विकृत वत्तीच्या रिक्षावाल्याने स्वतःच्याच नावाने गोपीका लिहीत आहे असं भासवन्या साठी पत्र लिहीले.
आणि तीच्या दफ्तरात ती चिठ्ठी घडी घालून ठेवली.त्याचा विचार असा असावा की ही चिठ्ठी गोपीका वाचेल व तीच्या मनात माझ्याबद्दल विचार जागा होईल व तसं काही तीला वाटलच तर ती चिठ्ठी ती मला देईल.म्हणतात ना
“कामातुरम् न भयं न लज्जा”।
त्यातलाच हा प्रकार
गोपीका खेळ संपवून रिक्षाकडे आली तर रिक्षा अजूनही तिथेच उभी होती .ती रिक्षात येऊन बसली मैदानावरच्या गमतीजमती सांगत ती बापाच्या वयाच्या जवळपास असलेल्या त्या रिक्षावाल्याशी मोकळ्या मनाने बोलत राहीली. घर आलं ती रिक्षावाल्याला टाटा करुन घरात निघून गेली. दुसरा दिवस रविवार सुट्टीचा असल्यामूळे रखमानं तीची दफ्तराची पिशवी धुवायला घेतली.सगळी वह्या पुस्तकं खाली ओतून तीनं दफ्तर धुवायला घेतलं. सहज हात घालून काही राहीलय का ते पाहाण्यासाठी तीनं दफ्तरात हात घातला तर तीच्या हाताला. तो चिठ्ठीचा कागद लागला.कुतूहलाने तीने ती चिठ्ठी उघडली अन वाचतवाचतच ती चक्कर येऊन घामेघूम झाली.तीचा गोपीका बद्दल गैरसमज निर्माण झाला. तात्याला तीने ती चिठ्ठी दाखवली दोघंही डोक्याला हात लावून बसले……..

क्रमशः

राजीवदा।
9595930992
श्रावणबाळ आश्रम इंदापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here